मा. पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना दिले. त्या अनूशंगाने पो.नी. महेश कोंडावार स्थागुशा चंद्रपूर यांनी पथक नेमूण त्यांना अवैद्य धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले दि. 16/06/2024 रोजी संपूर्ण चंद्रपूर जिल्हा परीसरात अवैद्य धंदयावर रेड व पेट्रोलींग करित असता गोपनिय बातमिदारा कडून माहीती मिळाली की गोवंश जनावराना कत्तलीसाठी निर्देयतेने कोंबून एक ईसम एका अशोक लेयलेंड कपंणीचा दोस्त प्लस वाहना मध्ये भरून त्यांना चंद्रपूर मार्गे घेवून जाणार आहे अशा खबरे वरून मौजा लोहारा ते चंद्रपूर रोडवरील हनूमान मंदीरा जवळ पंचासह नाकाबंदी केली असता एक अशोक लेयलेंड कपंणीचा दोस्त प्लस वाहना भरगाव वेगाने येत असताना दिसला त्यास ईशारा करून थांबविले असता सदर वाहनाची पंचासमक्ष पहाणी केली असता सदर वाहना मध्ये निर्दयतेने कोंबलेले व त्यांचे पाय, मान दोरी ने बांधून चारा पाण्याची कसलीच व्यवस्था नसलेले एकूण 07 जिवंत गोवंशीय गाय जनावरे किमंत 70,000/- रू. व एक जूना वापरता अशोक लेयलेड कपणीचा दोस्त प्लस के. एम एच 34 बि झेड 0104 किमंत 5,50,000/- रू. असा एकुण 6,20,000/- चा माल जप्त करण्यात आला असुन पुढील तपास कामी पोलीस स्टेशन रामनगर यांचे ताब्यात देण्यात आला.

तसेच अवैद्य धंद्यावर रेड व पेट्रोलींग करित असता गोपनिय बातमिदारा कडून माहीती मिळाली की मौजा सावली येथुन गडचीरोली जिल्हयात तीन वेगवेगळ्या वाहनामध्ये देशी विदेशी दारूचा साठा अवैद्यरित्या बाळगुन वाहतूक करित आहे अशा खबरे वरून मौजा पारडी ते सावली रोडवरील रुद्रापूर फाट्या जवळ नाकाबंदी केली असता दोन ईसम आले ज्युपीटर मो.सा. ने पायलेटींग करित असता मिळून आले व मुखबिरने सांगीतले प्रमाणे तिन वेगवेगळ्या वाहना मध्ये एकुण 59 पेटी देशी विदेशी दारूचा मुछेमाल एकुण किमंत 2,14,500/- रु. व दारू वाहतूकी करिता वापरलेले तिन चारचाकी वाहन व दोन दुचाकी वाहन किमत 23,45,000/- रू असा एकुण 25,59,500 रू. चा माल उकुरा सात आरोपी संगणमत करून वाहतूक करित मिळूण आल्याने त्यांचे कडुन जप्त करण्यात आला असुन पुढील तपास कामी पोलीस स्टेशन सावली यांचे ताब्यात देण्यात आले.सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन मा. अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्था.गु.शा.चे सपोनि मनोज गदादे, पोहवा दिपक डोंगरे, पोशि गोपीनाथ नरोटे, अमोल सावे स्थागुशा चंद्रपूर यांनी केली आहे.



