Friday, June 5, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

शैलेश अग्रवाल यांचे विधान परिषदेसाठी नामांकन दाखल.

काँग्रेस – महाविकास आघाडीचे चंद्रपूरात जोरदार शक्तिप्रदर्शन. 

चंद्रपूर : चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस – महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. शैलेश अग्रवाल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शक्तीप्रदर्शन केले.

नामांकन प्रक्रियेनंतर दि ग्रँड आयकॉन हॉटेल, चंद्रपूर येथे महाविकास आघाडीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधून महाविकास आघाडीच्या भूमिकेची माहिती देण्यात आली.

यावेळी विधीमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर, माजी मंत्री रणजित कांबळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे, शिवसेना उ बा ठा पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे, राष्ट्रवादी काँग्रेस श प पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर काँग्रेस अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी, काँग्रेस नेते विनायक बांगडे व सुभाषसिंह गौर यांच्यासह आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सभेदरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न आणि आगामी निवडणुकीत एकजुटीने विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले असून आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page