*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले जी यांच्या आदेशावरून संपूर्ण महाराष्ट्रात बदलापूर येथील दोन मुलीवर लैंगिक अत्याचार विरुद्ध महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातीलअहेरी तालुका काँग्रेस तर्फे मौजा-आल्लापल्ली येथे वीर बाबुराव चौकात महाराष्ट्राचा महायुती शासना विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील बदलापुरातील दोन चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार घटना बाहेर आली. आरोपी व शाळा भाजपाशी संबंधित असल्याने महाराष्ट्र राज्यातील पोलीस विभागाने बारा तास उलटूनही गुन्हा नोंद केला नव्हता. काँग्रेसने महाराष्ट्रात पाक्सी सारखा कायदा आहे, पण आरोपी भाजपाच्या असल्याने पाक्सी कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नव्हती,याच्या निषेध म्हणून अहेरी तालुका काँग्रेस तर्फे महाराष्ट्र शासनाचा व गृहमंत्री चा देवेंद्र फडणवीस यांचा निषेध आंदोलन करण्यात आला, या आंदोलनात अहेरी तालुक्यातील तालुकाध्यक्ष डॉ. निसार हकीम, रियाज शेख अध्यक्ष उद्धवराव जी ठाकरे शिवसेनाजिल्हाध्यक्ष गडचिरोली,जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मुस्ताक हकीम, रिजवान शेख उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग गडचिरोली, राहुल आईलवार अध्यक्ष किसान सेल अहेरी, किशोर शंभरकर, राघोबा गोरकर, रजाक पठाण, व्यंकटेश चिलणकर, आनंद रामगिरवार, रुपेश बंदेला, बहुतेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.*



