महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रामीण रुग्णालय अहेरी येथे शिवसेना सचिव मा. श्री. विनायक राऊत साहेब, मा. भास्कर जाधव साहेब आमदार तथा पूर्व विदर्भ संपर्क नेते, मा. प्रकाश वाघ साहेब पूर्व विदर्भ समन्वयक ,मा. महेश केदारी साहेब गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज शेख यांच्या नेतृत्वात रुग्णांना फळ वितरण कार्यक्रम घेण्यात आले. या शुभप्रसंगी प्रफुल एरणे तालुकाप्रमुख अहेरी, युवासेना तालुकाप्रमुख महेश मोहरले, नगरपंचायत सदस्य विलास भाऊ सिडाम, नवरास शेख नगरपंचायत सदस्य तथा युती सेना उपजिल्हा अधिकारी बबलू भाऊ सळमेक आदिवासी समाजसेवक तथा पत्रकार, आयान पठाण शहर प्रमुख, आरिफ भाई शेख उपतालुकाप्रमुख, रविभाऊ कपलवार उपशहर प्रमुख, मारुती सिडाम उपतालुकाप्रमुख ग्रामीण, रोहिणी युवती सेना शहर अधिकारी अहेरी, मनीषा आत्राम महिला आघाडी शहर संघटिका, स्नेहा सिडाम युवती सेना शाखा अधिकारी अहेरी, सोनू सडमेक शाखाप्रमुख धरमपूर, साहिल शेख दिनेश मोहरले, कैलास नैताम शाखाप्रमुख यावेळी प्रामुख्याने शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते तसेच साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक साप्ताहिक उपक्रम राबविण्यात येणार आहे तसेच *4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत भगवा साप्ताहिक कार्यक्रम सुद्धा अहेरी विधानसभा क्षेत्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद गट नुसार भगवा साप्ताहिक कार्यक्रम राबविण्यात येईल या माध्यमाने गाव तेथे शाखा घर तिथे शिवसैनिक* तसेच शिवसेना सदस्य नोंदणी, नवीन मतदार युवकांचे नाव नोंदणी कार्यक्रम बूथ प्रमुख, बी एल ए गटप्रमुख यांची नेमणूक कार्यक्रम सुद्धा राबविण्यात येणार असून अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी शिवसैनिक एकजुटीने अभियान राबविणार असल्याचे जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी या शुभप्रसंगी कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले.



