सेवानिवृत्त कर्मचारी यांचे जिल्हा अधिवेशन नुकतेच राजुरा येथील नगरपरिषद च्या हॉलमध्ये संपन्न झाले. सेवानिवृत्त शिक्षकांच्या व अधिकाऱ्यांच्या प्रथम अधिवेशनाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केले. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राज्य पदाधिकारी सन्माननीय सुरेश अनमुलवार विस्तार अधिकारी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक विजय भोगेकर गोसाई, धोटे, शिक्षण विभागाचे प्रतिनिधी मनोज गौरकार गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राजूरा, महिला उपाध्यक्ष नंदा सातपुते राजूरा येथील सेवाजेष्ठ शिक्षक आबाजी धानोरकर, दिनकरराव करनेवार गुरूजी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष केशवराव ठाकरे, शिक्षकेत्तर कर्मचाररी प्रतिनिधी पांडूरंग नान्ने, जिल्हा सरचिटणीस सुरेश बोंडे उपस्थित होते.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव संघटनेसोबत असतो. केवळ चंद्रपुरातील नव्हे तर विदर्भातील सर्व जिल्हयांमध्ये प्रशासनासोबत सभा घेवून चर्चा करून अनेक समस्या मी सोडवून दिलेल्या आहेत असे आमदार सुधाकर जी आडबाले म्हणाले. या अधिवेशन प्रसंगी आठवण म्हणून केलेल्या कामाचा आढावा आणि पुढे असलेल्या समस्या मागण्या संबंधाने कर्तव्यबंध नावाची स्मरणीका प्रकाशित करण्यात आली. जिल्हास्तरावरील व राज्यस्तरावरील मागण्यांचे निवेदन शिक्षक आमदार म्हणून त्यांना देण्यात आले तसेच काही महत्वाचे ठराव मंजूर करून जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले मनोज गौरकार सर यांच्याकडे देण्यात आले.
या अधिवेशनातील सुमारे ४०० प्रतिनिधी उपस्थित होते. सदर अधिवेशनाच्या यशस्वीते करिता नारायण कांबळे, तुकाराम कुचनकर, अरूण काकडे, दिपक वरेकर, पुष्पांकर बांगरे, बाळा आगलावे, अनिल चिलमवार,सुधाकर कातकर, शालिनी कुराणकर, नरेंद्र जनबधू, आशा पिंपळकर, आशा देहारकर, राजुरा तालुका शाखेचे संपूर्ण पदाधिकारी जिल्हयातील १४ तालुक्याचे अध्यक्ष सरचिटणीस व त्यांचे सहकारी यांनी परिश्रम घेतले सदर अधिवेशनाचे प्रास्ताविक चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गणपत विधाते यांनी केले तर सूत्रसंचालन अति उत्कृष्टपणे सुधाकर कातकर सेवानिवृत्त केंद्रप्रमुख यांनी केले कार्यक्रमाची सांगता विस्तार अधिकारी जयेंद्र राऊत सावली यांनी सर्व उपस्थित त्यांचे आभार मानून केली.
