Tuesday, April 21, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

बी.डी.ओ. श्रीमती राजकला चौधरी यांच्या अपघाती निधनानंतर सहयोग संस्थेने त्यांच्या कुटुंबाला १० लाख रुपयांचा धनादेश दिला

१५ मे २०२४ – बी.डी.ओ. (ब्लॉक विकास अधिकारी) श्रीमती राजकला चौधरी यांचे दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी फिल्ड दौऱ्यादरम्यान झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाने चौधरी कुटुंबियांवर शोककळा पसरली असून, घरातील कमावत्या व्यक्तीला गमावल्याने कुटुंब आर्थिक व भावनिक संकटात सापडले आहे.

सहयोग संस्थेचे ब्रीदवाक्य “जिथे पैशा पेक्षा माणसाला अधिक महत्व दिले जाते” याला अनुसरून, संस्थेने श्रीमती राजकला चौधरी यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचे ठरवले आहे. आज दिनांक १५ मे २०२४ रोजी सहयोग संस्थेच्या वतीने त्यांच्या वारसदारांना १०,००,०००/- (दहा लाख) रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. हा धनादेश प्रदान करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमात मान्यवर विलास वासनिक (सीईओ), जितेंद्र रंगारी (डायरेक्टर), परिक्षीत हरदुलकर (क्षेत्रीय व्यवस्थापक), मंगेश कठाने (वरिष्ठ व्यवस्थापक – १ क्षेत्र), आणि अमिश तराले (व्यवस्थापक – ३) उपस्थित होते. तसेच सहयोग संस्थेच्या मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी, चंद्रपूर जिल्ह्यातील शाखा व्यवस्थापक, टीम लीडर, आणि सर्व बी.डी.ओ. देखील या प्रसंगी उपस्थित होते.

श्रीमती राजकला चौधरी यांचे योगदान आणि कार्यासाठी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून सहयोग संस्थेने त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page