Sunday, April 19, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

इको-प्रोने मानले जिल्हाधिकाऱ्यांचे आभार

▫️रामाळा तलाव संवर्धनासाठी निधी

▫️एसटीपी आणि रिटेनिंग वॉल बांधकामासाठी 9.3 करोड रुपये

चंद्रपूर: रामाळा तलाव संवर्धनासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी 9.3 करोड रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून एसटीपी आणि रिटेनिंग वॉल बांधकाम करण्यात येणार आहे. ही मागणी मान्य केल्याबाबत इको-प्रो संस्थेने जिल्हाधिकारी यांचे आभार मानण्यात आले.

 

2021 मध्ये इको-प्रोने रामाळा तलाव सत्याग्रह-आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर तलावाचे खोलीकरण करण्यात आले. मात्र, एसटीपी आणि रिटेनिंग वॉल बांधकामासाठी निधी उपलब्ध नव्हता. 22 फेब्रुवारी 2024 रोजी इको-प्रो पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार खनिज विकास निधी अंतर्गत एसटीपी आणि रिटेनिंग वॉलच्या बांधकामासाठी 9.3 करोड रुपये मंजूर केले आहेत. या निधीमुळे रामाला तलाव संवर्धनाचा महत्वाचा टप्पा पूर्ण होण्यास मदत होईल.

इको-प्रोच्या शिष्टमंडळाने पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले. शिष्टमंडळात बंडू धोतरे, अभय बडकेलवार, सेवानिवृत्त वनाधिकारी, नितीन रामटेके, अब्दुल जावेद आणि भारती शिंदे उपस्थित होते.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page