८ मार्च नुकताच जागतिक महिला दिन संपूर्ण भारतामध्ये राबवल्या गेले आणि आज अत्यंत दुर्दैवी घटना नागपूर शहरात सुरेश भट सभागृह येथे झाली भारतीय जनता पार्टी नागपूर शहरातर्फे बांधकाम कामगार व घरेलू कामगारांची नोंदणी व कीट वाटप शिबिर सुरेश भट सभागृहनागपूर येथे दिनांक ८/३/२०२४ ला राबवण्यात येत होते अनेक महिला सकाळी ५.०० वाजता पासुन रांगेत उभे राहत होत्या परंतु आज दिनांक ९/३/२०२४ ला सकाळी ७.०० वाजता पासून महिला खूप मोठ्या प्रमाणात सुरेश भट सभागृह येथे आलेले होत्या अफाट प्रमाणात गर्दी जमलेली होती परंतु सकाळी गेट न उघडता १०.३० वाजता गेट उघडताच महिला एकमेकांच्या अंगावर पडल्या व चेगराचेंगरीमध्ये एक महिला मृत पावली आशीर्वाद नगर येथील मनू तुळशीराम राजपूत वय 65 वर्षाची महिला हिचा यामध्ये मृत्यू झाला व अनेक महिला गंभीर जखमी झाल्या , यामध्ये आमच्या काही महिला कार्यकर्त्या सुद्धा आहेत या संपूर्ण घटनेची जबाबदारी कत्राटदार (ठेकेदार)याची होती ,दोन दिवसापासून हजारोच्या संकेत महिला येत आहे , तर व्यवस्थापक आणि ठेकेदार यांनी समय सुचकता दाखवून संबंधित भाजप पदाधिकारी यांना कळवायला हवे होते परंतु ठेकेदार यांच्या दुर्लक्षपणामुळे ही अत्यंत दुर्देवी घटना आज आपल्या नागपूर शहरात झालेली आहे याला जबाबदार सुरेश भट येथील व्यवस्थापक आणि कत्राटदार यांच्यावर कलम ३०२ मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करायला हवा जेणेकरून भविष्यात यांच्याकडून अशा चुका होणार नाही.
अशी मागणी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख मनीषा पापडकर यांनी केलेली आहे



