प्राथमिक स्थरावर २० शिलाई मशीनचे युनिट उभे करण्याचे नियोजन करण्यात आले असुन नावाची नोंदणी सुध्दा केल्या गेली.
महीलाना स्वालंबी बनविणे व त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी तसेच महिला उद्योजकतेला समर्थन आणि प्रोत्साहन देवून महिला उद्योजकता मजबूत करण्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) तर्फे वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वात,चंद्रपुर जिल्हा सघंटीका नर्मदा बोरेकर,भद्रावती तालुकाप्रमुख नंदूभाऊ पढाल, तालुका महिला संघटिका आशाताई ताजने यांचे मार्गदर्शनात माजरी – पाटाळा क्षेत्रातील महिलांना उद्योजक म्हणून काम करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करुन देण्याकरीता शिवसेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे विविध लघु उद्योग निर्मितीकरण्याकरीता महीलाची मते जानुन घेवुन त्याचे मागणी प्रमाने व बाजार पेठेच्या मागणीप्रमाने लघुउघोग उभारण्याचे नियोजन करण्यात आले असुन अनेक महीला समोर आल्या असुन चंद्रपुर जिल्हा महीला सघंटीका सौ नर्मदा बोरेकर यांचे नेतृत्वात ७५ वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्रात महीलासाठी विविध लघुउघोग निर्मित करुन महीलाना काम देण्याचे कार्य शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात येणार आहे.



