तलांडी दांम्पत्यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान
*सिरोंचा:*- विदर्भात प्रसिद्ध असलेले सर्वोदय शिक्षण मंडळाचे नवी कार्यकारिणी नुकतेच गठित करण्यात आले असून यात उपाध्यक्ष पदी सिरोंचा येथील सगुणा तलांडी यांची निवड करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीत अध्यक्ष पदी गडचिरोली येथील सहकार महर्षी अरविंद पोरेडीवार, उपाध्यक्ष पदी सगुणा तलांडी, कार्याध्यक्ष पदी आमदार किशोर जोरगेवार, कोषाध्यक्ष पदी संदीप गड्डमवार तर सदस्य पदी चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल यांची सर्वानुमते निवड करण्यात आले.
प्रामुख्याने सगुणा तलांडी हे शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात सदैव सक्रिय व अग्रेसर असतात. आदिवासी बहुल, मागासले व दुर्गम भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे शैक्षणिक व सर्वांगीण विकास व्हावे यासाठी सदैव धडपड व प्रयत्नरत असतात.
विशेष म्हणजे त्यांचे पती माजी आमदार पेंटा रामा तलांडी हे सुद्धा प्रसिद्ध व नामवंत वनवैभव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत.एकंदरीत तलांडी दांम्पत्यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात फार मोठे योगदान आहे.
सगुणा तलांडी हे मागील अनेक वर्षांपासून सर्वोदय शिक्षण मंडळाच्या सदस्य पदी कार्यरत असून नुकतेच उपाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड झाल्याने त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव केल्या जात आहे.



