Sunday, April 19, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

अक्षय तृतीयेच्या पावन पर्वावर श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व भजन-कीर्तन सोहळा संपन्न

अक्षय तृतीयेच्या पावन पर्वावर गुरुवार दि. १ मे रोजी दुपारी २ वाजेपासुन तर सायंकाळी ८ वाजेपर्यंत स्थानिक बाजार वॉर्डातील रवींद्र शिंदे यांच्या निवासस्थानी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व भजन-कीर्तन सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी स्थानिक रवींद्र शिंदे यांच्या निवासस्थानी दि. १ मे रोज गुरुवारला सकाळी शेगाव निवासी गजानन महाराज, भांदेवाडाचे जगन्नाथ महाराज, अमरावती जिल्ह्यातील घुईखेड येथील संजीवन समाधिस्त श्री संत बेंडोजी महाराज यांच्या पादुकांचे आगमन झाले. त्यानंतर श्री संतश्रेष्ठ सदगुरु यांच्या पादुकांचे रितसर पुजन करण्याचा पहिला मान जयंत हरणे व त्यांचा अर्धांगीणी संगीता हरणे यांना मिळाला. त्यापाठोपाठ उपस्थित भाविक भक्तांनी पुजन व प्रार्थना केली.

श्री सदगुरु संत पादुका पुजन व दर्शन सोहळयास ग्रामिण क्षेत्रातील एकुण ४२ भजन मंडळीनी सहभाग नोंदवीला. यात महीला भजन मंडळ, बालगोपालांचे भजन मंडळ, श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ यांनी उत्कृष्ठ अशी भजने सादर करीत भक्तीभाव वातावरण तयार केले तसेच उपस्थित भावीक भक्तगण भजन मंडळीच्या गजरात रमली.

श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व भजन सोहळा कार्यक्रमास भद्रावती येथील ह.भ.प. केशवानंद मेश्राम महाराज यांच्या सुमधुर वाणीतुन उपस्थित भाविक भक्तांनी किर्तनाचा आनंद घेतला.

1 मे हा जेष्ठ साहित्यक नागोराव थुटे यांचा वाढदिवस असल्याने याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, संस्थापक सदस्य रविंद्र शिंदे, भांदेवाडा जगन्नाथ बाबा संस्थानचे बाबाराव धानोरकर, मदनराव ठेंगणे, निखाडे गुरुजी तथा भाविक भक्तांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ देत वाढदिवस साजरा करण्यात आला.

स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे उपक्रम “हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजना” अंतर्गत भद्रावती तालुक्यातील चिरादेवी येथील बाबुराव खंडारकर यांना दिव्यांग तीन चाकी सायकल भेट देण्यात आली.

ट्रस्टचे संस्थापक सदस्य तसेच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) चंद्रपूर जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत ट्रस्टच्या माध्यमातुन सुरु असलेल्या योजना वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभ्यासिका योजना, विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदे विषयक मार्गदर्शक उपक्रम, श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियान, हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजना, डॉ. एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना, अनाथांची माय स्व. सिंदूताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना तसेच कै. म.ना.पावडे क्रिडा स्पर्धा अश्या विविध योजनांची माहिती दिली तसेच भाविक भक्तांना व उपस्थित नागरीकांना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजीत करण्यात आलेले श्री सदगुरु संत पादुका पुजन व दर्शन सोहळयाची सांगता महाप्रसादाव्दारे करण्यात आली. शेकडोच्या संख्येत उपस्थित भाविक भक्त तसेच नागरीकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page