चंद्रपूर नदीच्या इराई आणि झरपट नदीच्या संगमा जवळ पुर क्षेत्रा च्या बाहेर अति प्राचीन गावाचे संशोधन करताना बोर नावाचे मूळ चंद्रपूर चे एक नष्ट झालेले गाव आढळले आहे. इतिहास अभ्यासक आणि संशोधक प्रा सुरेश चोपणे ह्यांना संगमा जवळ १० हजार वर्षा पूर्वीच्या पाषाण युगीन आदी मानव , पूर्वीच्या २ हजार वर्षा पूर्वीचे सातवाहन , वाकाटक आणि यादव काळातील प्राचीन गाव सापडले असल्याची माहिती प्रा चोपणे त्यांनी दिली.
आज हे गाव बोर रिठ म्हणुन गावकऱ्यांना माहिती असून ते गवळी गाव असेल असे त्यांना वाटते परंतु प्रा सुरेश चोपणे ह्यांचे संशोधनात त्यांना तिथे १० हजार वर्षापूर्वीची पाषाण युगीन अवजारे, ३ हजार वर्षादरम्यानची दगडांच्या वस्तू,२ हजार वर्षा दरम्यान ची मडके, प्राण्यांची हाडे, दात आणि लोह वितळणारी भट्टीचे लोह खडक आढळले. इथे प्राचीन काळात एक मंदिर होते,त्याची दोन शिवलिंग आणि मंदीराचे काही अवशेष सुद्धा तिथे पडली असून अलीकडच्या काळातील हनुमान मंदिर बांधलेले आहे. शेती असणाऱ्या लोकांना काही वर्षा पुर्वी प्राचीन नाणे आणि अलंकार सापडले होते.आज तिथे जरी शेती असली तरी पडलेल्या घरामुळे तिथे टेकडी तयार झाली असून अजून उत्खनन केल्यास अनेक पुरावे मिळू शकतात असे प्रा सुरेश चोपणे ह्यांचे मत आहे.
आज जरी चंद्रपूर ला गोंड राजाने वसविले असले तरी त्या पुर्वी झरपट आणि इराई नदी हीच पाषाण युगीन काळात ५० हजार वर्षापासून मानवाची वस्ती होती. पुढे ५ हजार काळा पासून इथे आदिवासी वस्ती करून राहायला लागले. पूर्वी सर्वत्र बारमाही नद्या जवळच गावे असायची.
३ हजार वर्षांपूर्वी झरपट नदीजवळ पापामिया टेकडी जवळ(आजचे मेडिकल कॉलेज),गाव होते .इराई नदीजवळ आजच्या आरवट गावाजवळ, होमिओपॅथी कॉलेज जवळ तसेच पठाणपुरा गेट च्या जवळ केवळ 1.2 किमी अंतरावर आणि संगमा पासून 1 किमी अंतरावर बोर रीठ आहे. संगमा जवळ सुधा एक माना गाव होते. बहुदा लालपेठ, बाबूपेठ कदाचित ह्याच गावांना हिंदू काळात लोकपुर आणि इंदूपुर म्हणत असावे.

चंद्रपूर जिल्ह्यात गोंड राजा पुर्वी भद्रावती आणि भटाडा हे सर्वात मोठे गाव आणि व्यापार केंद्र होते, तसेच चंद्रपूर येथे सुद्धा पूर क्षेत्राच्या बाहेर आदिवासी गावे, हिंदू गावे होती.
पाषाणयुगीन वस्ती
आजच्या चंद्रपूर शहराचा इतिहास पाहिल्यास लक्षात येथे की इराई आणि झरपट नदिंमुळे येथे मोठ्या संख्येने पाषाण युगीन आदिमानव राहत होते. दाताळा, नागाळा, देवाडा आणि आरवट ह्या सर्व क्षेत्रात देशातील सर्वात मोठे पाशानुगीन स्थळ असून इथे मला सर्वाधिक पाषाण युगीन अवजारे सापडली आहेत. त्याच प्रकारे झरपट नदीच्या आधारे पापामिया जवळ दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पाशाणयुगीन स्थळ आढळले असून इथेसुद्धा एक गाव होते कारण ह्याच ठिकाणी शिवलिंग आणि हत्तीचे शिल्प मला सापडले आहे.ह्या वस्त्या पाच ते दोन हजार वर्षादरम्यान तयार झाल्या.
सातवाहन ते यादव काळ
आजच्या चंद्रपूर जवळील प्राचीन वस्ती हे बोर रिठ आहे कारण इथे एकाच ठिकाणी पाषाण युगीन अवजारे, 2000 वर्षापूर्वी चे सातवाहन कालीन पुरावे, दीड हजार वर्षा दरम्यान चे वाकाटक आणि बाराव्या शतका नंतरचे यादव कालीन पुरावे आढळली आहेत. चंद्रपूर जवळील सर्व गावात बोर रिठ हे सर्वाधिक प्राचीन असून आजच्या चंद्रपूर शहराचे मूळ गाव आहे असे पुराव्या वरून कळते.
गोंड राजे ते भोसले
आजच्या चंद्रपूर च्या परिसरात आणि जिल्ह्यात जी प्राचीन गावे होती त्यावर सातवाहन, वाकाटक आणि यादव राजांचा प्रभाव होता, त्यानंतर इसवी सन 10 नंतर वणी,चांदा येथील गावात राहणाऱ्या राजगोंड समाजाने सत्तेची सुरुवात केली.आणि शिरपूर, बल्लाळ शहा आणि चंद्रपूर येथे सत्ता सुरू केली.पुढे पश्चिम महाराष्ट्र कडील भोसले ह्यांनी नागपूर, चंद्रपूर येथे सत्ता केली. इंग्रजांनी पुढे चंद्रपूर चा विकास केला.
गोंड कालीन, भोसले आणि ब्रिटिश कालीन इतिहास आज माहिती असला तरी चंद्रपूर चे मूळ गाव हे बोर रिठ हेच असल्याचे पुरावे मला मिळाली आहेत.
—————
*प्रा सुरेश चोपणे*
इतिहास अभ्यासक आणि संशोधक ,चंद्रपूर



