Wednesday, April 22, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

अशोका बुध्द विहार” येथे शिलभद्र मंडळ व सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने बुध्द पौर्णिमेचा कार्यक्रम घेण्यात आला

*बुध्द पौर्णिमा कार्यक्रम*

विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या बुध्द पौर्णिमेनिमित्त “अशोका बुध्द विहार” येथे शिलभद्र मंडळ व सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने बुध्द पौर्णिमेचा कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी बुध्द वंदना, ध्वजारोहण आदी कार्यक्रम घेण्यात आले. लहान बालकांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. धम्मचारी चंद्रवीर आंतरराष्ट्रीय धम्मचारक यांनी व स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक या नात्याने मी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. मार्गदर्शनातून ट्रस्टची माहीती दिली. माझ्या हस्ते विजेत्या बालकांना बक्षीस वितरण करण्यात आले. महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देवुन माझा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाकरीता अध्यक्ष भारतभाऊ खोब्रागडे, उपाध्यक्षपदी भावनाताई खोब्रागडे, ट्रस्टचे अध्यक्ष धनराज पाटील आस्वले, सचीव सौ. रुपालीताई रविद्र शिदे उपस्थित होते.

बुध्द पौर्णिमेचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता समस्त शिलभद्र मंडळांची कार्यकारणी आदींनी परिश्रम घेवुन गौतम बुध्दाची शिकवन व विचार या माध्यमातून जीवनात यशस्वी होण्याकरीता काय केले पाहीजे, असे बौध्दिक मार्गदर्शन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्याचे कार्य केले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आहे.

 

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page