Wednesday, April 22, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

भामडेळी येथे मोफत ओजस्वी वाचनालय सुरू

भद्रावती तालुक्यातील ताडोबाच्या कुशीत वसलेल्या भामडेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते अमोलभाऊ जिवतोडे व सौ सुषमा जिवतोडे यांनी त्यांच्या सत्यशोधक विवाह सोहळ्याच्या पाचव्या वाढदिवसा निमित्ताने सामाजिक ऋण म्हणून स्वतःच्या घरी स्वखर्चाने वाचनालय सुरू केले .गावातील आबालवृद्धानी या वाचनालयाचा लाभ घ्यावा असे आव्हान केले

सदर वाचनालयाचे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्प अर्पून श्री विलास सोयाम राऊंड ऑफिसर यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत च्या प्रथम नागरिक सौ सुषमा जीवतोडे,सुखदेव दडमल, विकास घरत,विकास जीवतोडे, ईश्वर घोडमारे,सुधीर भोयर, सुरेश मंगाम व गावातील महिला पुरुष तसेच बालगोपाल व आदिवासी ताडोबा युवक बचत गटाचे सदस्य उपस्थित होते..

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page