खासदार नागरिकांशी संवाद व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत
*सर्वांनी उपस्थित राहण्याचे माजी आमदार तलांडी यांचे आवाहन*
एक दिवसीय मुक्कामी असणार
*सिरोंचा :-* मंगळवार 10 सप्टेंबर रोजी महविकास आघाडीचे गडचिरोली – चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान एक दिवसीय मुक्कामी सिरोंचा दोऱ्यावर येत असून महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव, महिला भगिनी, नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन काँगेस पक्षाचे माजी आमदार पेंटा रामा तलांडी यांनी केले आहे.

उल्लेखनीय म्हणजे खासदार डॉ. नामदेवराव किरसान या आधी अनेकदा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील सिरोंचा तालुक्यात येऊन गेले असून खासदार बनल्या नंतर प्रथमतःच सिरोंचा तालुक्यात येत असल्याने महाविकास आघाडीतर्फे प्रथम आगमणा निमित्याने भावपूर्ण सत्कारही करण्यात येणार आहे.

सत्कारा नंतर नागरिकांशी हितगुज व संवाद साधणार असून त्या नंतर अधिकारी, कर्मचारी यांच्याशी आढावा बैठक घेऊन सिरोंचा तालुक्यातील अंकिसा, आसरअल्ली, झिंगानुर, रेगुंठा आदी ग्रामीण भागातील समस्या , अडी अडचणी जाणून घेऊन कार्यकर्ते व शेतकरी यांच्याशी संवाद साधणार आहेत.




