Sunday, April 19, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाच्या पाच दिवसांत १५०० रक्तदात्यांनी केले रक्तदान, २९ जुलैपर्यंत सुरू राहणार रक्तदान शिबिरे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर मतदारसंघात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, फक्त पाच दिवसांत १५०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करत रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान असा संदेश दिला आहे. हे रक्तदान शिबिरे २९ जुलैपर्यंत सुरू राहणार आहेत.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून २० जुलैपासून चंद्रपूर मतदारसंघात देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहा’ला सुरुवात झाली आहे. या सेवा सप्ताहाअंतर्गत विविध सामाजिक, धार्मिक, आरोग्यवर्धक व शैक्षणिक उपयुक्त कार्यक्रम राबविले जात आहेत. यामध्ये रक्तदान शिबिरे, योग प्रात्यक्षिके, वक्तृत्व स्पर्धा, रोजगार मेळावे, शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण आणि इतर उपक्रमांचा समावेश आहे.

या उपक्रमांत विशेषत: ५५ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून दररोज ८ ते १० रक्तदान शिबिरे पार पडत आहेत. मागील पाच दिवसांत झालेल्या २७ शिबिरांमध्ये १५०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. या शिबिरांना रक्तदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्यामुळे रक्ताच्या टंचाईवर काही प्रमाणात मात केली जाणार आहे.

यासोबतच, चंद्रपूर येथील राज्यातील सर्वात प्राचीन शिवलिंगाजवळ रुद्राभिषेक व जलाभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शकुंतला लॉन येथे विद्यार्थिनींना २०५५ सायकली वाटप करण्यात येणार आहे. याच ठिकाणी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page