महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर करण्यात आला. बोर्डाच्या बारावी परीक्षेत शहरातील विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी जोरदार कामगिरी केली. बारावी विज्ञान शाखेत डॉ. आंबेडकर कॉलेजचा सिबतेन रझा शेख याने ९६.६७ टक्के गुण प्राप्त केले. वाणिज्यमध्ये एमकेएच संचेती पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या श्रुती बागडदेव हिने ९६.५० टक्के गुण प्राप्त केले. तर कला शाखेत आदर्श विद्या मंदिर या शाळेच्या अनुष्का केशरवानी हिने ९५.१७ टक्के गुण प्राप्त केले. या तिन्ही विद्यार्थ्यांनी बारावी बोर्डाच्या परीक्षेत उपराजधानीतून संभावित विज्ञान शाखेतून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. याशिवाय विज्ञान शाखेमध्ये शिवाजी सायन्स कॉलेजच्या रूपल रक्षकने ९५.१७ टक्के गुण, तर डॉ. आंबेडकर कॉलेजच्या स्वर्ण राजनकरने ९३.६७ टक्के गुण प्राप्त केले.




