अलीकडेच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना तर्फे, शिक्षक सेना राज्यप्रमुख तसेच मुंबईचे शिक्षक आमदार श्री. ज. मो. अभ्यंकर यांच्या आदेशानुसार, दिनांक २६ जून ते २६ जुलै या कालावधीत श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा महिना साजरा करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये शिक्षक सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिळून सुमारे ३ लाख रोपे वृक्षारोपण कार्यक्रमाद्वारे लावली. या उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना आज दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई येथील शिवाजी मंदिरात पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष राजेश नायडू यांना सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो शिक्षक उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या उपक्रमांचे मनःपूर्वक कौतुक करताना श्री. ज. मो. अभ्यंकर यांच्या कार्याचेही कौतुक केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की “शिक्षकच समाजाचा खरा सुधारक ठरतो, परंतु भाजपामध्ये बहुतेक निरक्षर नेते असल्यामुळे ते देशाला दिशाहीन नेतृत्व देत आहेत.”



