शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
७५ वरोरा-भद्रावती विधानसभा

श्री साईबाबा देवस्थान समिती पिर्ली तह भद्रावती येते “ वार्षिक उत्सव” संपन्न होत आहे. सदर कार्यक्रम भक्ति भावाने व सर्व भक्तांच्या उपस्थित पार पडत असुन श्री साईबाबा देवस्थान समिती पिर्ली कडुन माझा सत्कार करणयात आला असुन याप्रसंगी श्रीनिवास शिदे मेमोरिबल चॅारिटेबल ट्रस्ट च्या वतीने सुरु असलेल्या सामाजिक कार्याची माहीती देण्यात आली असुन गरजु लोकानी नेहमी ट्रस्ट ची मदत घ्यावी असे आव्हान करण्यात आले. कॅान्सा तह. भद्रावती येते दि.२९/१२/२०२३ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्थिती निमित्य व श्रध्देय बाबा आमटे यांचे जयती निमित्याने श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे. तरी सवॅानी भाग घ्यावा असे ट्र्स्ट व गुरुदेव सेवा मंडळ कॅान्सा मार्फत आव्हान करण्यात आले.तसेच शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) सदैव आपल्या सेवेत आहे राहील असेही माहीती देण्यात आली. याप्रसंगी माझे सोबत भद्रावती तालुका प्रमुख नरेद्रं पढाल, नदुभाऊ वाढई, विष्णुदास मत्ते व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होती.

