Sunday, April 19, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची अवैध रेती तस्करीविरूध्द धडक कार्यवाही

चंद्रपूर जिल्हयातील अवैध रेती तस्करीला आळा घालण्याकरिता चंद्रपूर जिल्हयाचे पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपूर यांनी संपूर्ण पोलीस ठाणे प्रभारी व स्थानिक गुन्हे शाखा यांना निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथकांनी आठवडाभरात संपूर्ण जिल्हयांतर्गत अवैध रेती तस्करीला आळा घालणेकरिता मोहीम राबवून १) पो. स्टे. राजूरा येथे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे ५ ट्रॅक्टर व चोरीची रेती असा एकूण ३७,१९,०००/- रू., २) पो.स्टे. भद्रावती अंतर्गत १ ट्रॅक्टर व चोरीची रेती असा एकूण ०६,६०,०००/- रू ३) पो.स्टे. विरूर अंतर्गत १ ट्रक व चोरीची रेती असा एकूण २२,२०,०००/- रू ४) पो. स्टे. पडोली अंतर्गत १ ट्रॅक्टर व चोरीची रेती असा एकूण ०८,०५,०००/- असे ८ वाहने व चोरीची वाळू मिळून ७४,०४,०००/- रू. चा मुददेमाल जप्त करण्यात आला. तसेच वाहन चालक मालक असे ११ जणांविरूध्द संबंधित पोलीस स्टेशनला रेती चोरी, गौण खनिज अधिनियम व महाराष्ट्र महसूल अधिनियम अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपूर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळया पथकांनी केली.

मा. पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचेकडून संपूर्ण चंद्रपूर जिल्हयातील जनतेला आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपापले परिसरात कोठेही अवैध रेती उत्खनन किंवा वाहतूक, तसेच ईतर अवैध व्यवसायांबाबत माहीती पोलीस नियंत्रण कक्ष तसेच डायल ११२ या कमांकावर कळवावी.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page