सिरोंचा शहरात किंव्हा तालुक्यात बऱ्याच वर्षपासून वातानुकूल शवगार फ्रिज ( Ac शवपेटी ) उपलब्ध नसल्याने नागरिकांना त्रास सहन होत आहे. सिरोंचा हे तालुका ठिकाण असुन शहरात Ac शवपेटी उपलब्ध नाही ही गंबीर बाब आहे. रात्री अपरात्री सर्वदूर फिरूनही शवपेटी मिळत नाही त्यामुळे अंत्यविधी सुद्धा लवकर करावे लागत असल्याने जवळचे नातेवाईकांना शेवटचे अंत्यदर्शन साठी मुकावे लागत आहे. त्या करीता नगरपंचायत तर्फे शवपेटी उपलब्ध करावी. तसेच सिरोंचा नगर पंचायत हद्दीअंतर्गत येत असलेल्या शहरातील विविध वॉर्डात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. या समस्यांचे तत्काळ निराकरण करण्याच्या मागणीला घेऊन सिरोंचा काँग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी नगर पंचायत कार्यालय येते मागण्यांचे निवेदन नगराध्यक्ष यांना सादर करण्यात आले.शहरातील बंद असलेले वॉटर एटीएम दुरुस्त करण्यात यावे, हायमॉस्ट पथदिवे तत्काळ दुरुस्ती करावे, शहरातील विविध वार्डात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने तत्काळ प्रतिबंधात्मक फवारणी करावी, शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करावी आदी मागण्यांचे निवेदन नगराध्यक्षा यांना सादर करण्यात आले.यावेळी नगरपंचायत उपाध्यक्ष श्री. बबलु भाऊ पाशा यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शिष्टमंडळाशी चर्चा करुन लवकर समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. तसेच वातानुकुल शवगार फ्रिज( Ac शवपेटी) नागरिकांच्या सेवा साठी लवकरच उपलब्ध करण्याची गाव्ही देण्यात आले.
कांँग्रेसचे जेष्ठ नेते ,माजी आमदार पेन्टांरामा तलांडी ,सिरोंचा कांँग्रेस चे तालुका अध्यक्ष सतिशभाऊ जवाजी,जेष्ठ कांँग्रेसचे नेते,श्री.ब्रम्हनंदजी कोत्तागट्टू,शकंर मंचार्ला,मारुती गणपुरवार,अडप्पा मल्लया,समय्या चिलमुला,आंनद पाशा,शहर अध्यक्ष सलाम,शहर उपाध्यक्ष प्रवीण नामानी,युवा.कांँग्रेसचे माजिद अली,अल्पसख्यांक सेलचे उपाध्यक्ष एम.ऐ.अली हे उपस्थीत होते।



