Tuesday, August 25, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मुस्ताक हकीम यांच्या नेतृत्वात मुंबई येथे स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंती व सद्भावना मेळाव्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्या सोबत मुंबई रवाना-अहेरी विधानसभा क्षेत्राबाबत चर्चा

*गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्तेमाजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी  यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिवस व संकल्प मेळाव्याचे आयोजन माटुंगा मुंबई येथे करण्यात आले होते. त्याकरिता अहेरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्ते हे मुंबई येथे गेले असता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नाना भाऊजी पटोले, व गडचिरोली -चिमूर निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवरावजी किरसान यांच्यासोबत अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राबाबत चर्चा करण्यात आली, यात या क्षेत्रातील बहुतेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्र हा काँग्रेस च्या कोट्यात घेण्यात यावे असे सांगितले व त्या क्षेत्रातील लोह खनिज वाहतूक मुळे त्या क्षेत्रातील रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब झालेली आहे,

आलापल्ली ते सिरोंच्या या 353 सी राष्ट्रीय महामार्ग दहा वर्षे होऊन सुद्धा पूर्ण झालेला नाही, त्यामुळे त्या क्षेत्रातील लोकांना मुख्यालय गडचिरोली येथे स्वतःची कामे करण्यासाठी तेलंगणा मार्ग जावे लागत आहे, वारंवार शासनाला तक्रार करून सुद्धा कोणतीच कारवाई होत नाही, परंतु आता काँग्रेस तर्फे आंदोलनाची धमकी दिल्यामुळे शासनातर्फे भर पावसाळ्यात लहान लहान रपट्याचे व पुलाचे कामे चालू केलेली आहे, पुलाचे बांधकाम खोदून ठेवले आहे व तात्पुरत्या स्वरूपात बाजूला माती टाकून रस्ता निर्माण केलेला आहे, त्यावरून आलापल्ली ते सिरोंच्या बस वाहतूक चालू आहे, परंतु पाऊस जास्त झाल्याने तात्पुरत्या स्वरूपाचा रस्ता हा पाण्याने वाहून जात आहे त्यामुळे त्या क्षेत्रातील वाहतूक पूर्णपणे बंद आहे, त्यामुळे त्या क्षेत्रातील लहान लहान मुला-मुलींना शाळेत जाण्यासाठी पण फार त्रास सहन करावा लागत आहे, व तसेच अहेरी विधानसभा क्षेत्रातील गैर आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे अजून पर्यंत पट्टे मिळालेले नाही, गैर आदिवासी शेतकऱ्यांचे तीन पिढीचे पुरावे ही अट शिथिल करण्यात यावी,इत्यादी अहेरी विधानसभा विधानसभा क्षेत्रातील समस्या पूर्णपणे मा. अध्यक्ष यांच्यापुढे मांडण्यात आले, व त्यांना अहेरी विधानसभा क्षेत्रात आपण भेट देऊन,या संपूर्ण समस्या सोडवण्याबाबत सहकार्य करावे, व  येणाऱ्या विधानसभा मध्ये ज्या लोकांनी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ व निष्ठावंत आहेत,अशाच व्यक्तीला प्रथम प्रधान्य देऊन,त्यांना निवडणुकीत उमेदवारी देण्यात यावी, या चर्चेमध्ये अहेरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्ते मुस्ताक हकीम उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली, रिजवान शेख शेख उपाध्यक्षअल्पसंख्याक विभाग गडचिरोली, प्रकाश मुंजमकर अनुसूचित जाती अध्यक्ष अहेरी तालुका, राहुल आयलवार अध्यक्ष किसान सेल अहेरी, व्यंकटेश चिलनकर, किशोर शंभरकर, सुरेश दुर्गे, विलास शेंडे, चंदू बोरुले, बंडू शिडाम, तानिया दूर्वा, राजू उसेंडी, सैनु आत्राम, आनंद रामगिरवार, जाफर सुफी भामरागड, विजय कुडयामी भामरागड, सलीम शेख भामरागड, इत्यादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते!

 

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page