Thursday, October 8, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

नागपूर येथील ‘ युवा मंथन ‘विज्ञान प्रदर्शनात बल्लारपुर पब्लिक स्कूल येनबोडीचा तृतीय क्रमांक

व्हिएनआयटी (VNIT), नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा मंथन ओपन सायन्स एक्जीबिशन मध्ये बल्लारपूर पब्लिक स्कूल येनबोडीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या स्पर्धेत बल्लारपूर पब्लिक स्कूलचे इयत्ता दहावीचे विद्यार्थी सोहम मुरकुडे आणि यश मल्लेवार यांनी बायोकॉफ्टर हे नाविन्यपूर्ण विज्ञान मॉडेल सादर केले. या प्रकल्पाचे प्रभावी स्पष्टीकरण पियुष परसुटकर यां विद्यार्थ्यांनी केले . हा प्रकल्प मिकीन कामटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आला. या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थ्यांना 21000 रुपये रोख पारितोषक व पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांची कल्पकता वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अथक मेहनत यामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या यशाचे विशेष श्रेय नाविन्यपूर्वक विचारांना चालना देणारे मार्गदर्शक मिकीन कामटे सर तसेच विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि कल्पकतेला जाते.

या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष श्री संजय वासाडे सर व्यवस्थापक डॉ. प्रा. मेघा शुक्ला मॅडम. मुख्याध्यापिका सौ ज्योत्स्ना बाबुलकर मॅडम विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकाचे अभिनंदन केले आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या…

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page