Sunday, April 19, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

शरनमं बहुउद्देशिय संस्थेतर्फे वृक्षारोपण

चंद्रपूर (का.प्र.) – दिनांक ५ जुन जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन येथील प्रबुद्ध ज्येष्ठ नागरीक संघाच्या भव्य परिसरात शरणम बहुउद्देशिय सामाजिक विकास संस्थेतर्फे विविध प्रजातीच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी झाडे लावा झाडे जगवा चा संदेश देत वृक्ष लागवड तसेच वृक्षसंवर्धनाचे महत्व संस्थेचे अध्यक्ष श्री शेखर तावाडे यांनी पटउन दिले तसेच पुढील पावसाळ्याचे तिन महिने विविध ठीकानी व्रूक्षारोपन करून पर्यावरना संबधी जनजागरुकता निर्मान करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रबुद्ध ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष श्री हरिदासजी देवगडे, हेल्पिंग हँन्ड्स टीमचे अध्‌यक्ष श्री प्रदिप अडकीने, सौरभ होरे फोंडेशन चे अध्यक्ष श्री दिलीप होरे, लोकसंघ सोशल एजुकेशन मुव्हमेंट चे भास्कर मुन, डॉ. जितेंद्र खोब्रागडे, हर्षित भसारकर, एन ए रायपूरे, प्रभुदास पुनेकर, नरसींग नंदागवळी, राजीव गावंडे, प्रमोद गीरसावळे, लता बहादे, सखाराम वनकर, बंडू दुधे, गमतीदास चांदेकर, विठ्ठल मुन, आनंद वनकर,अभिषेक डोईफोडे,शिवम उरकूडे, चंद्रशेखर गावंडे,स स्मीता पेरके, ऋतुराज तावाडे यांनी वृक्षारोपण केले. प्रास्ताविक श्री प्रदीप अडकीने तर आभार शेखर तावाडे यांनी मानले.*

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page