कोरपना – ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही. त्यामुळे त्यांचे यादीत नाव आले नाही. त्यामुळे या अर्थसहाय्य पासून शेतकरी वंचित राहणार आहे. या दृष्टीने शासनाने सरसकट संपूर्ण शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान द्यावे या मागणीचे निवेदन तालुका कृषी अधिकारी कोरपना मार्फत शासनाला भारतीय जनता पार्टी तालुका कोरपना च्या वतीने देण्यात आले.
सन २०२२-२०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे शेतमालांना भाव मिळू शकला नाही. त्यामुळे शासनातर्फे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये प्रोत्साहन अनुदान म्हणून दिले जाणार आहे. यात पात्र शेतकऱ्याची यादी जाहीर झाली. परंतु पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांना या अर्थसहाय्यापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. ही बाब लक्षात घेता संपूर्ण शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्यात यावे अशी अपेक्षा निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. याप्रसंगी निवेदन देतेवेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संजय मुसळे,महामंत्री सतीश उपलेंचीवार , विजय रणदिवे, किशोर बावणे ,अरुण डोहे, शशिकांत आडकिने, विशाल गजलवार ,संजय पिंपळशेंडे, निखिल भोंगळे, अरविंद तिरनकर, आबाजी बोबडे , मालेकर आदी सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.



