Monday, August 24, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

अहेरी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे वेलादी कुटुंबीयांना आर्थिक मदत

अहेरी .. तालुक्यातील येर्रागट्टा या गावातील बाजीराव वेलादी वय ६ वर्ष आणि दिनेश वेलादी वय ३.५ वर्ष या दोन भावंडाचा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे ४ सप्टेंबर रोजी निधन झाल्यामुळे वेलादी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अहेरी तालुका काँग्रेस कमिटी शिष्टमंडळातर्फे यांना यर्रागट्टा येथे जाऊन वेलादी कुटुंबीयांना सांत्वना देऊन आर्थिक मदत केली. तसेच प्रशासनातर्फे वेलादी कुटुंबीयांना आर्थिक मदत तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावी आणि मृत बालकांना घरी घेऊन जाण्याकरिता जिम्मलगट्टा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळेवर  ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली नाही त्यामुळे पालकांना नाईलाजास्त दोन्ही मुलांचे शव कडेवर घेऊन स्वगावी जाण्यास भाग पाडले यामुळे जीमलगट्टा येथील वैद्यकीय अधिकाऱ्या विरोधात चौकशी नेमून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदविण्यात यावा असे आवाहन अहेरी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष डॉ.अ.निसार हकीम यांनी केले आहे यावेळी मुलांची आई रामबाई रमेश वेलादी आणि वडील रमेश चिन्हा वेलादी, रामप्रसाद मुंजमकर (एससी सेलचे तालुकाध्यक्ष),गणेश उपलपवार, व्यंकटेश डोंगरे, मासा वेलादी, वंजा तलांडी, पोच्या गावडे, सुरेश पिंडो,बक्का गावडे, समय्या मिसाल, इंदाराव तलांडी,बुच्ची तलांडी, सुनिता गावडे, गिरमा हिच्यामी, लालसु नरोट, लक्ष्मण पुंगाटी, चिन्हा महाका आदी गावकरी मंडळी उपस्थित होती.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page