*सिरोंचा:*- 9 आगष्ट जागतिक आदिवासी दिनी सिरोंचा शहरात वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या निता तलांडी यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आले.
झाडांचे व आदिवासी समाजाचे अनन्य साधारण महत्व व सबंध असून झाडांमुळे प्रदूषण रोखल्या जाते तसेच ऑक्सिजन हे प्राणवायू असल्यामुळे झाडे लावणे व टिकवून ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे निता तलांडी यांच्या पुढाकारातून शहरात वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी निता तलांडी यांनी, आदिवासी समाज निसर्गपूजा करीत असल्यामुळे झाडे लावणे व टिकवून ठेवणे गरजेचे असल्याचे म्हणत विविध प्रजातीचे झाडे व वनस्पती आरोग्यासाठी गुणकारी व औषधीसाठी उपयुक्त असून कर्तव्ये समजून प्रत्येकानी झाड लावून संवर्धन केल्यास पर्यावरणाचा -हास थांबते व समतोल राखण्यासाठी मदत होते असा संदेशही निता तलांडी यांनी दिले.
वृक्षारोपनाच्या वेळी माजीद अली, नौशाद शेख, स्वाती अडेपू, माधुरी विरार, स्वाती अडेप्पू, केसर राचावार, कृपा नलबुग्गा, रमेश तोटा, अमोल मानकार, शंकर डोंगरे, हरीश ठाकूर, प्रवीण जीलेल्ला, व्येंकटेश जेळा, छोटू खान, कार्तिक आम्बीलापू, संतोष काट्टावार आदी उपस्थित होते.



