Wednesday, April 22, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

बाबुपेठ,रेल्वे उडानपुलीयाचे बांधकाम तात्काळ करण्याचे पाझारे यांचे सा.बां. वि. ला निवेदन

चंद्रपूर:- मागील काही वर्षापासून धीम्या गतीने सुरु असलेल्या बाबूपेठ रेल्वे उडान पुलीयाच्या बांधकामामुळे त्या मार्गाने रहदारी करणाऱ्या नागरिकांना खूप हालाकीचे जीवन जगावे लागत आहे. तसेच पावसाळा सुरू झाल्यामुळे नागरिकांना खूप त्रासाला सामोरे जावे लागते त्यामुळे त्यांना होत असलेली समस्या येथील नागरिकांनी महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांच्या समोर मांडली. त्यांनी पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात संबंधित रेल्वे उडान पुलाच्या बांधकामाचा आढवा घेऊन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग-२, चंद्रपूर यांना निवेदन दिले. सदर उडान पुलाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून दिलासा द्यावा अशी विनंती केली आहे.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page