*अहेरी विधानसभा निवडणुकीसाठी बहुतेक इच्छुकांनी आपले उमेदवारीचे अर्ज भरलेली आहे. सन 2019 विधानसभेमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झालेली होती. तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार दीपक दादा आत्राम हे उमेदवार होते परंतु त्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार पराभूत झाले व नंतर ते बी.आर.एस या पक्षात त्यांनी प्रवेश केला. आता अहेरी विधानसभा क्षेत्रातून बहुतेक लोकांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज भरलेला आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रातून नवीन आलेला व्यक्ती व रमलेल्या मुसंडी राजकारणी यात मोठा फरक आहे. राजनीतिक अनुभव नसलेला नवीन चेहरा देताना मोठी रिस्क नको,असे मत यावेळी निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्याकडून व्यक्त केल्या जात आहे. अशावेळी विनाकारण रिस्क घेत जागा गमावण्यापेक्षा जे काँग्रेसचे निष्ठावंत व काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ व संघटनेचे जबाबदारी ज्यांनी सांभाळलेली आहे.व एक अनुभवी आणि कुशल संघटक व्यक्तीला उमेदवारी देणे हे काँग्रेसला परवडेल. त्यामुळे या मतदारसंघातून माजी आमदार पेंटा रामा तलांडी हे पुष्कळ वर्षापासून काँग्रेस काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत यात कोणतीही शंका नाही तरी येणाऱ्य विधानसभेमध्ये माजी आमदार पेंटा रामा तलांडी यांनाच उमेदवारी मिळेलयात मुळीच शंका नाही.त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार पेंटा रामा तलांडी हेच प्रबळ दावेदार व प्रभावी उमेदवार ठरू शकतात एवढे नक्की– .



