जगद्गुरु समर्थ राधेश्यामस्वामी यांच्या ‘अनाम महासरोवर’ महाकाव्याचे प्रकाशन समारंभनवी दिल्ली येथे झाले !
नागपूर ५, मुख्य जन्मग्राम तीर्थक्षेत्र बेला भगवान कोलबास्वामी पीठाचे पीठाधीश्वर व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘समाजभूषण’ पुरस्कार्थी, मंत्रालय मुंबई, प. पू. जगद्गुरु समर्थ राधेश्यामस्वामी यांच्या ‘अनाम महासरोवर’ या महाकाव्याचे अनावरण ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१, २२, व २३ फेब्रु. २०२५ ला, ताल कटोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे भरगच्च प्रमाणात पार पडले. त्या ठिकाणी ८० पुस्तकांचे प्रकाशन समारंभ पार पडले, २२ ता. ४० ग्रंथामधुन, ‘अनाम महासरोवर’ या महाकाव्याचे अनावरण संध्याकळी, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी उपसभापती आमदार मा. निलीमाताई गोरे, यांच्या शुभ हस्ते आनंदात पार पडले. मा. घनश्याम पाटील ग्रंथ निवड समितीचे अध्यक्ष होते त्यांनी राधेश्यामस्वामींच्या महाकाव्य ग्रंथाची ‘अनाम महासरोवरांची’ निवड केलेली होती. अखिल भा. म. सा. संमेलनाचे निमंत्रक व सरहद संस्थेचे अध्यक्ष, (पुणे) मा. संजयजी नहार प्रामुख्याने ग्रंथ अनावरणच्या वेळी उपस्थित होते. राधेश्यामस्वामी हे एक क्रांतिकारी राष्ट्रीय कवी असून, एक उत्तम साहित्यिक आहेत, त्यांच्या एका ‘रक्तबंबाळ टाहो’ या संगीतमय नाटकाच्या पुस्तकाचे अनावरण गझल सम्राट कवीश्रेष्ठ सुरेश भट यांच्यां शुभ हस्ते सन १९९५ ला झाले. ‘अनाम महासरोवर’ या महाकाव्याला पद्मश्री कवीवर्य नारायण सुर्वे यांची प्रस्तावना असून, विद्यावाचस्पती जेष्ठ साहित्यिक प्राचार्य राम शेवाळकर यांचे अभिप्राय, पद्मश्री थोर साहित्यिक डॉ. गंगाधर पाणतावणे (मराठवाडा) यांचे अभिप्राय या ग्रंथाला मिळालेले आहेत. व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. म. गो बोकरे यांचे अभिप्राय मिळाले असून नागपूर विद्यापीठ पुरस्कृत झालेले आहे. या महाकाव्याला मा. केन्द्रिय मंत्री नितीनजी गडकरी व आमदार गिरीशजी व्यास यांनी सुंदर या महाकाव्याला अभिप्नाय दिलेला आहे. या महाकाव्यात भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय मा. नरेन्द्रजी मोदी यावर ‘काव्य गुंफलेले’ आहेत. हे पुस्तक अत्यंत बिकट परिस्थतीत कल्याण (मुंबई) इथे प्रकाशित करण्यात आले असून, मा. देवरावजी मते मुद्रक असून, या ‘अनाम महासरोवर’ महाकाव्याचे प्रकाशक कुमार शुक्रकांत असून, हे पुस्तक नागपूर विश्व साहित्य पीठतर्फे प्रकाशन करण्यात आलेले आहेत. या संपुर्ण महाकाव्याचे दुःख तळागळातील सर्व सामान्य माणसांचे दुःख आहेत. अपंग, महारोगी बंधु-भगिनींची सेवा करतेवेळी हे महाकाव्य जन्मास आलेले आहेत. ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक, प्रधानमंत्री नरेन्द्रजी मोदी होते; स्वागताध्यक्ष पद्मविभुषण शरदजी पवार, प्रमुख पाहुणे देवेन्द्रजी फडणवीस मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर तर निमंत्रक संजयजी नहार, महामंडळ अध्यक्ष प्रा. उषा तांबे हे होते. राधेश्यामस्वामी हे एक क्रांतिकरी राष्ट्रीय कवी असून, आगामी महाकाव्य ‘महाविश्वगुरु भारत’ पाचशे पेजेसचे प्रकाशित मराठी वृत्तांत होत आहे.



