Sunday, April 19, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

केंद्रीय अर्थसंकल्पात निराशाच!राज्यासाठी एकही मोठा प्रकल्प व योजना नाही

माजी आमदार पेंटा रामा तलांडी यांची प्रतिक्रिया

सिरोंचा:- केंद्रात भाजप सरकार सत्ता स्थापने नंतर पहिला अर्थसंकल्प 23 जुलै रोजी घोषित करण्यात आला. अर्थसंकल्पात प्रामुख्याने बिहार व आंध्र प्रदेशला झुकते माप तर महाराष्ट्राला इंगा दाखविल्याचे दिसत आहे, अशी खरमरीत प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे माजी आमदार पेंटा रामा तलांडी यांनी प्रसिध्दी पत्रकातून व्यक्त केली आहे.

पत्रकात माजी आमदार पेंटा रामा तलांडी यांनी नमूद केले आहे की, महाराष्ट्रात एकही प्रकल्प किंवा नवी योजना स्थापित करण्यासबंधी कुठलीच तरतूद करण्यात आली नसून भाजपातील केंद्र सरकार वेळोवेळी महाराष्ट्राच्या वाट्याला दूजाभाव व नाराजीच दाखवीत असते.

राज्यात बेरोजगारी, महागाईमुळे जनता त्रस्त असताना रोजगार निर्मितीसाठी कुठलाच प्रकल्प महाराष्ट्राला दिले नाही, उलट बिहार व आंध्रप्रदेश ला भरभरून दिल्याचे माजी आमदार तलांडी यांनी प्रसिद्धी पत्रकात मत व्यक्त करून सर्वसामान्य कामगार, असंघटित कामगार, तसेच अंगणवाडी शालेय पोषण आहार, कामगारांच्या हितासाठी एकही रुपयाची तरतूद अर्थसंकल्पात केली नसल्याची नाराजी व प्रतिक्रिया प्रसिध्दी पत्रकातून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ट नेते व अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे माजी आमदार पेंटा रामा तलांडी यांनी मत व्यक्त केले आहे.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page