स्थानिक डॉ. खत्री महाविद्यालय, तुकूम, चंद्रपूर येथील विद्यार्थीनी खेळाडु विशाल नामदेव भोयर, बि.ए. द्वितीय वर्ष याची गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली पॉवरलिफ्टींग संघात निवड झाली असुन दिनांक ०३ ते ०७एप्रिल २०२५ दरम्यान युनिव्र्व्हसिटी ऑफ कश्मिर येथे स्पर्धा संपन्न होत असुन हा विद्यार्थी गोंडवाना, गडचिरोली विद्यापीठाचे प्रतिनीधीत्व करीत आहे.
याच्या या यशाकरीता महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभागप्रमुख प्रा. आशिष एस. चहारे यांनी मार्गदर्शन केले. यांच्या या नेत्रदिपक कामगिरीबद्दल ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. एन.एच. खत्री सर तसेच संस्थेचे सचिव डॉ. एस.बी. कपूर सर, कोषाध्यक्षा श्रीमती अनुश्री पाराशर मॅडम तथा सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.एम. काकडे तसेच सर्व प्राध्यापकवृंद, कार्यालयीन कर्मचारी यांनी शुभेच्छा देत कौतुक व अभिनंदन केले आहे.



