Sunday, April 19, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

सरदार पटेल महाविद्यालयात संवाद कौशल्य या विषयावर कार्यशाळा आयोजित

चंद्रपूर: सरदार पटेल महाविद्यालयात कार्यरत इंग्रजी विभागातर्फे पीएम-उषा योजना – सॉफ्ट कंपोनेंट अ‍ॅक्टिव्हिटी अंतर्गत संवाद कौशल्य या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्दिष्ट प्रत्यक्ष सहभागातून विद्यार्थ्यांना आधुनिक संवाद्माध्यमांशी परिचय साधून त्यांचे संवाद कौशल्य वाढवणे होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी.एम. काटकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आजच्या व्यावसायिक जगात प्रभावी संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यशाळेसाठी आय आय एम नागपूरचे माजी विदयार्थी श्री. आशिष लेखवानी तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी सहभागींना संवाद कौशल्याच्या मूलभूत गोष्टी आणि प्रभावी व्यावसायिक पत्रव्यवहाराच्या धोरणांवर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या दरम्यान विद्यार्थांनी संवाद कौश्यल्यावर एक लघु नाटिका सदर केली. कार्यशाळेच्या शेवटच्या भागात विदयार्थी समूह चर्चेत सहभागी झाले. सदर कार्यशाळेला १७० विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.सिमरन कपूर यांनी, तर आभार प्रदर्शन प्रा.संकेत शहारे यांनी केले. याप्रसंगी इंग्रजी विभागप्रमुख आणि कार्यशाळा समन्वयक डॉ. अक्षय धोटे, डॉ. सतीश कन्नाके, डॉ. प्रफुल्लकुमार वैद्य, डॉ. संजय उराडे, प्रा. अमोल कुटेमाटे, डॉ.आम्रपाली देवगडे आदी उपस्थित होते.

दरम्यान, सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ.कीर्तिवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल, यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले .

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page