Sunday, April 19, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

पावसामुळे शेतकरी झाले बिमा योजना पासून वंचित

अहेरी विधानसभा क्षेञात सतत ५ते ६दिवसापासुन मुसळधार पाऊस होत आहे,या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकरयाचे पिकाचे अतोनाद नुकसान झालेले आहे,यांची माहीती पिक विमा कपंनी ला देण्याकरिता ४८तासाऐवजी ३०दिवसाची वाढ द्यावी अशी मागणी अहेरी विधानसभा क्षेञाचे कांँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार पेन्टांरामा तलांडी यांनी शासणा कडे केली आहे.

सविस्तर माहीती या प्रमाणे आहे की,अहेरी विधानसभा क्षेञात पाच तालुके येतात,या पाच ही तालुक्यातच सतत ५ते६दिवसापासुन मुसळधार पाऊस पळत आहे,यामुळे या क्षेञातील नदी-नाले तुडुंब भरलेले आहे.या क्षेञात वैनगंगा- प्राणहीता या नदीला पुर आल्याने आजुबाजुचा नाल्याचे पाणी हे गावात व शेतातमध्ये शिरुन लोकांचे घर व शेतकरयाचे पिकाचे/कापसाचे फार नुकसान होत आहे.याच्या मोबदला मिळण्याकरिता शासणाने प्रत्येक शेतकरयाचे रु.१/- प्रमाणे विमा केलेला आहे.व तसेच निर्देश दिलेले आहे की आपले पिकाचे नुकसान झाले असतील तर ते ४८तासाच्या आत Online अर्ज सादर करा,अन्यथा आपला अर्ज स्विकृत होणार नाही,व आपल्याला पिक विमा मिळणार नाही,परंतु अहेरी विधानसभा क्षेञ हा अति-दुर्गम असुन तालुके पासुन बहुतेक गावे ही ५०ते ६०कि.मि.अतंरावर आहे,तिथे कोणतेही नेट-वर्गाचे साधन नाही,तसेच केन्द्र शासणाने प्रत्येक ग्राम पचांयत मध्ये करोडो रु.खर्च करुन ते प्रत्येक ग्राम पचांयत On-line करण्याचे होते,परंतु अजुन पर्यत एक ग्रामपचांयत on-line झालेली नाही,त्यामुळे गावातील शेतकरयाणा आपले अर्ज भरण्यासाठी तहसिल मध्ये यावे लागते,परतु त्याना या पावसा मध्ये येण्यासही फार ञास करावा लागणार आहे,व तसेच या क्षेञात नेटची ही फार अडचण होते,या क्षेञात BSNL ची नेट व्यवस्था ही बरोबर राहात नाही, या सर्व गोष्टींचा विचार करुन पिक विमा नुकसानभरपाई अर्जाची मुद्दत ४८ तासाऐवजी ३०दिवसाची करावी,जेणे ज्या शेतकरयाचे पिकाचे अतोनाद नुकसान झालेले आहे,असे शेतकरी ५०ते६०कि.मि. अतंरावर जावुन आपले अर्ज भरु शकेल,अशी मागणी शासणाला या क्षेञातील कांँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार श्री.पेन्टांरामा तलांडी या निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासणाला केली आहे.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page