१) चंद्रपुर पोलीस दलाच्या आस्थापनेवर दिनांक १९.०६.२०२४ रोजी सकाळी ०५.०० वा. पासुन जिल्हा क्रिडा संकुल, चंद्रपूर येथे पोलीस शिपाई भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे
२) सदर भरतीमध्ये एकुण १३७ पोलीस शिपाईची व ०९ बॅण्डस्मनची रिक्त पदे भरण्यात येणार आहे. ३) पोलीस शिपाई पदासाठी एकुण २२५८३ आवेदन अर्ज प्राप्त झाले असुन त्यामध्ये पुरुष उमेदवार १३४४३ व महिला उमेदवार ६३१५ तसेच ०२ तृतीयपंथी उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहे. बॅण्डस्मन पदाकरीता पुरुष उमेदवार २१७६ व महिला उमेदवार ६४६ तसेच ०१ तृतीयपंथी उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहे.
https://youtu.be/h3A-lp97djw?si=LK5cSfv2OPfJpx9D me
४) जिल्हा किडा संकुल, चंद्रपुर येथील प्रवेशद्वारावर उमेदवारांचे ओळखपत्र बघुन (उदा. आधारकार्ड, चालक परवाना, निवडणुक कार्ड इत्यादी) आतमध्ये उमेदवारांना शैक्षणीक कागदपत्रे घेवुन प्रवेश दिला जाईल. इतर साहीत्य प्रेवश द्वारावर जमा करण्यात येईल.
५) उमेदवारांची हजेरी घेवुन त्यांना छाती / उंची मोजमाप करुन त्यांचे कागदपत्र तपासण्यात येतील व बायोमॅट्रीक हजेरी घेवुन उमेदवार यांना चेस्ट क्रमांक वाटप करुन शारिरीक चाचणी करीता मैदानावर पाठविण्यात येईल.
६) मैदानावर उमेदवारांची शारिरीक चाचणीमध्ये पुरुषाची १०० मिटर / १६०० मिटर व महिलाची १०० मिटर/८०० मिटर धावण्याची चाचणी ही कृत्रीम धावपट्टी SYNTHETIC TRACK वर घेण्यात येईल त्यामध्ये उमेदवारांना SPIKE SHOES वापरता येणार नाही. SYNTHETIC TRACK वर SPORT SHOES वापरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
७) उमेदवारांनी कोणतेही उत्तेजनार्थ पदार्थाचे सेवन करणार नाही याबाबत त्यांचेकडून हमीपत्र घेण्यात येणार आहे.
८) भरती प्रक्रिया पारदर्शकपणे घेण्याकरीता RFID पध्दतीचा वापर करण्यात आलेला आहे.
९) भरतीप्रक्रियेमध्ये हि व्हिडीओ शुटींग तसेच सिसिटीव्ही च्या निगराणीमध्ये घेण्यात येणार असल्याने कोणीही उमेदवार कोणाच्याही अमिशाला बळी पडू नये. पोलीस शिपाई म्हणुन भरती करुन देता असे कुणी बोलत असल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपुर यांचेकडे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचेकडे तक्रार करु शकतील.
१०) बाहेर गावी राहत असलेल्या उमेदवारांना रात्रीला पाऊस आल्यास झोपण्याची व्यवस्था पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथील ड्रिल शेड मध्ये करण्यात आलेली आहे.
११) जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होवु शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल



