Tuesday, May 26, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

महाशिवलिंग विकासासाठी वेकोलि सीएमडींची पाहणी, आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाठपुराव्याला यश

शहरालगत असलेल्या महाशिवलिंग परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता गती मिळताना दिसत आहे. त्यांच्या पुढाकारातून वेकोलीचे सिएमडी हेमंत पांडे यांनी आमदार किशोर जोरगेवार व विविध संबधित अधिका-यांसह महाशिवलिंग क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करत प्रस्तावित विकासकामांचा आढावा घेतला.

यावेळी वेकोलीचे महाप्रबंधक संजिव रेड्डी, मनपा उपअभियंता आशिष भारती, सार्वजनिक बांधकाम विभाागचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता साबळे, भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री सविता दंढारे, रविंद्र गुरुनुले, बलराम डोडाणी, मनपा गटनेते शेखर शेट्टी, अजय जयसवाल, तुषार सोम, श्याम ढोपटे, पिं्रन्स प्रसाद आदिंची उपस्थिती होती.

या पाहणीदरम्यान आमदार जोरगेवार यांनी महाशिवलिंग क्षेत्राच्या एतिहासिक धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या असलेल्या महत्त्वावर विशेष भर देत, येथे येणार्या हजारो भाविकांसाठी मूलभूत सुविधा निर्माण करणे अत्यावश्यक असल्याचे म्हटले. वाढत्या भाविकसंख्येमुळे पाणी, स्वच्छता, रस्ते, प्रकाशव्यवस्था आणि सुरक्षेच्या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी यावेळी बोलुन दाखविली.

आमदार जोरगेवार यांनी वेकोलि प्रशासनासमोर सविस्तर विकास आराखडा मांडत पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी आरओ प्लांट, जलपुरवठा सुधारणा, मंदिर परिसराचे सुशोभीकरण, सुरक्षा भिंत, सोलर हायमास्ट लाईट, प्रशासकीय कार्यालय, तसेच भक्तांसाठी निवास व्यवस्था याबाबत सविस्तर चर्चा केली. यासोबतच महाशिवलिंगपर्यंत जाणार्या मार्गाचे मजबुतीकरण, स्वागतद्वारांची उभारणी, दिशादर्शक फलक, स्वच्छतागृहे आणि परिसरातील स्वच्छता मोहीम यांसारख्या सुविधांवरही त्यांनी विशेष भर दिला.

पाहणीदरम्यान वेकोलि अधिकार्यांनीही या प्रस्तावांचा सकारात्मक विचार करण्याचे संकेत दिले असून आवश्यक तांत्रिक व आर्थिक बाबींचा आढावा घेऊन लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. आमदार जोरगेवार यांनी या कामांसाठी वेकोलिकडून आवश्यक निधी व तांत्रिक सहकार्य मिळावे, यासाठी पुढील स्तरावरही पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.

महाशिवलिंग क्षेत्राचा विकास झाल्यास चंद्रपूरच्या पर्यटन नकाशावर या स्थळाला नवे स्थान मिळेल, तसेच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केला. त्यांच्या पुढाकारामुळे महाशिवलिंग परिसराचा कायापालट होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पउले आहे.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page