Monday, October 12, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

चंद्रपूर महावितरण कार्यालयासमोर कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन* 5 मार्च पासून बेमुदत काम बंद आंदोलन

 

महाराष्ट्र राज्य भर कंत्राटी कामगारांचे आंदोलनाचे वारे पेटलेले चित्र दिसून येत असून अनेक वर्षापासून कंत्राटी कामगार शासन दरबारी आपल्या मागण्यासाठी अनेक आंदोलने व पत्रव्यवहार करुन सुध्दा शासन व प्रशासन कंत्राटी कामगारांच्या मागण्या पुर्ण करण्यास दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे महानिर्मिती, महापारेषण व महावितरण कंपनीतील 29 संघटनांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 2024 च्या मार्फत तिन्ही कंपनीतील कामगारांच्या प्रमुख मागण्यामध्ये पगार वाढ व NMR (नॉमिनल मस्टर रोल) पद्धती ने कामगारांना कंपनीत सामावून घेणे हरियाणा पॅटर्न प्रमाणे कंत्राटदार मुक्त रोजगार व अन्य १७ मागण्या करीता राज्यभरात सहा टप्प्यांमध्ये आंदोलनाचे दिशा ठरवण्यात आले त्यामध्ये पुढील पहिला टप्पा दि.९ फेब्रुवारी पासून सुरू झाला व त्यामध्ये पाचवा टप्पा २८ फेब्रुवारी च्या मध्यरात्री च्या 00.00 वाजेपासून २९ फेब्रुवारी च्या मध्यरात्री 00.00 वाजेपर्यंत 48 तासा काम बंद धरणे आंदोलन 85 टक्के यशस्वी झाले आहे तसेच दिनांक 29 फरवरी 2024 रोजी 95 टक्के काम बंद धरणे आंदोलन कामगारांच्या एकजूटिने यशस्वी रित्या पार पडला व येत्या 5 मार्च आगोदर प्रशासनाने संयुक्त कृती समिती सोबत बैठक लावून सकारात्मक निर्णय देईल नाही तर राज्यभर काम बंद आंदोलनाचा प्रभाव महाराष्ट्र राज्य संपूर्ण पणे अंधारमय होईल असे आव्हान संयुक्त कृती समिती चंद्रपूर च्या वतीने करण्यात आला आपल्या न्याय हक्काच्या 17 मागण्या संदर्भात आंदोलनात सामिल झालेल्या संपूर्ण कंत्राटी कामगारांचे संयुक्त कृती समिती ने महानिर्मिती , महापारेषण व महावितरण कंपनीतिल कंत्राटी कामगारांचे आभार मानले व शासन व प्रशासन यांनी मागण्या पूर्ण न केल्यास येत्या 5 मार्च रोजीला बेमुदत काम बंद आंदोलना चा ईशारा कृती समितीची वितीने करण्यात आला आहे .

________________________________

 

तिन्ही कंपनीतील कंत्राटी कामगार हे अहो रात्र उन्हाळ्यात पावसाळा किंवा हिवाळा असू द्या ते आपले कर्तव्य नेहमी जिवाची परवा न करता लाईन वर काम करतात परंतु त्यांना नेहमीत कामगारांच्या पेक्षा कमी पैसा मध्ये लाईनवर रिक्ससी काम करावे लागतात त्यांना कसलाही प्रकारचा मेडिकल क्लेम सुद्धा उपलब्ध नाहीत त्यानंतर सुध्दा महावितरण कंपनीत नेहमीत कर्मचारी बदली करुन आले तर महावितरण कंपनी बरेच वर्षापासून काम करत असलेल्या कंत्राटी कामगाराला कामावरुन कमी करुन त्याला घरी बसवले जाते व त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते.हे आता थाबले नाही तर 5 मार्च पासून कामगार बेमुदत काम बंद आंदोलन करुन विघुत भवन येथे आंदोलनात बसेल तरी सुद्धा शासन व प्रशासन ला जाग न आल्यास आत्मदहन करेल …..

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page