Monday, April 20, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

तहसिलदारांनी दिले येवती गावातील शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करण्याचे आदेश

*शिवसेना तालुका प्रमुख दत्ताभाऊ बोरेकर यांच्या निवेदनावर केली तात्काळ कार्यवाही*

वरोरा तालुक्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस व गारपीट झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे खुप नुकसान झाले असुन त्यांच्या हाताशी आलेले पिक नष्ट झाले. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याकरीता तहसिलदार, वरोरा यांना निवेदन देण्यात आले. परंतु काही गावांमध्ये तलाठ्यानी पंचनामे केले नाही त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाई पासुन वंचित राहत आहे.

याच अनुषंगाने आज दि.05 ला मौजा येवती येथील सरपंच पवन पिजदुरकर तथा गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शिवसेना प्रमुख दत्ताभाऊ बोरेकर यांना शिवालय येथे निवेदन दिले त्यामध्ये त्यांनी येवती गावातील तलाठ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे न करता तहसिलदारांकडे निरंक अहवाल पाठविल्याचे कळले. त्यावर दत्ताभाऊ बोरेकर यांनी त्यावर तात्काळ तहसिलदार यांना निवेदन देवुन येवती येथील पंचनामे करण्याबाबत सांगितले, त्यावर तहसिलदार वरोरा यांनी संबंधीत तलाठी यांना फोन करुन येवती येथील नुकसान्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करण्याबाबत आदेश दिले.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दत्ताभाऊ बोरेकर, येवती येथील सरपंच, पवन पिजदुरकर, ओकेश्वर टोंगे, सुयोग ढोके, त्र्यबंक ढोके, लिलेश्वर पेटकुले, धिरेश ताजले, दिपक मांदाडे, आशिष टोंगे, मोरेश्वर बोढे, व इतर शेतकरी उपस्थित होते.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page