Sunday, April 19, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मुस्ताक हकीम हे अति दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करणार

*गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मुस्ताक हकीम यांच्या कोंदेवाई, पैमा, गुर्जा, या गावातील आदिवासी समाजाच्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील—–एटापल्ली तालुक्यातील अति दुर्गम अविकसित बिड्री ग्रामपंचायत अंतर्गत कोंदेवाई, पैमा, गुर्जा, हे आदिवासी वस्तीची गावे आहेत. हे संपूर्ण गावातील लोकांचे मुख्य व्यवसाय शेती हा आहे.यांचे परिवार शेती व्यवसायावरच अवलंबून असतात, या गावातील आदिवासी शेतकऱ्यांनी आपले वन हक्काचे प्रकरण सण 2012 – 2013 आपले वन दावे वन समितीमार्फत मा. उपविभागीय अधिकारी साहेब एटापल्ली येथे सादर केलेले होते. या संपूर्ण प्रकरणाचे छाननी करून काही प्रकरण त्रुटी अभावी रद्द करण्यात आलेले होते. या त्रुटी मध्ये या संपूर्ण शेतकऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्र व वन अतिक्रमण नसल्याचे त्रुटी मध्ये आढळून आले, त्यानुसार या संपूर्ण शेतकऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्र बनवून देण्यात आले, व तसेच वन अतिक्रमण पुराव्यासाठी तहसील कार्यालय एटापल्ली गावकऱ्यासोबत जाऊन या संपूर्ण गावकऱ्यांचे अतिक्रमण पुरावे मिळण्याबाबत मा. तहसीलदार साहेब यांच्यासोबत चर्चा केली व त्यांना निवेदन देतानी गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे मुस्ताक हकीम, राजू उसेंडी, सैनू शिडाम, संजय दलू आत्राम, निलेश गंगावनवार, मंगेश तलांडे, श्यामराव सडमेक,

शंकर आत्राम, शामराव पुंगाटी, सुरेश तलांडे, अनिल पुंगाटी इत्यादी गावकरी उपस्थित होते.*

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page