चंद्रपूर: महानिर्मिती सी.एस.टी.पी.एस.(चंद्रपूर) बेमुद्दत संपामध्ये सहभागी असल्यामुळे कामावरून कमी केलेल्या अडोरे कंट्रक्शन कंपनीतील ५ कामगारांना महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजूर सेना जिल्हाध्यक्ष सदानंद देवगडे तसेच कामगार नेते प्रमोद कोलारकर यांच्या संयुक्त चिकाटीच्या परिश्रमाने कामगारांना मिळाला न्याय. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र हे विद्युत निर्मितीचे भारतातील सर्वात मोठे तसेच आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे असणारे सर्वात मोठे महाऔष्णिक विद्युत केंद्र जरी असले तरी येथे कोट्यावधी संपत्ती असणाऱ्या कंत्राट दाराकडून आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या कामगारांचे शोषण नेहमीच होत असल्याचे दिसून येत असते. बेमुद्द्त राज्यव्यापी आंदोलनात दि.५ मार्च २०२४ ते ९ मार्च २०२४ सहभागी असल्या कारणाने संच ८/९ मधील वार्षिक (ए.एम.सी.) कॉन्ट्रॅक्ट फॉर मेकॅनिकल मेंटेनन्स (सी.एच.पी.डी) मधील मागील ३ ते ४ वर्षापासून काम करणारे कामगार
१) अनिकेत शरद शेंडे (हेल्पर)
२) राजू एकनाथ रेनकुंटवार (वेल्डर)
३) अंकुश परशुराम ढवळे (वेल्डर)
४)रितिक प्रफुल चौबे (हेल्पर)
५)प्रमोद माणिकराव गोहाडे (हेल्पर) या वरील सर्व कामगारांनी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजूर सेना जिल्हाध्यक्ष सदानंद देवगडे तसेच कामगार नेते प्रमोद कोलारकर यांना पाचही कामगारांनी १८ मार्चला समस्येसंदर्भात माहिती दिली आणि आपल्याला तातडीने पुर्ववत कामावर घेण्यात यावे. त्याकरिता महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजूर सेना, सलग्न न्यू ट्रेट युनियन इनिशीएटिव्ह या संघटनेकडे धाव घेतली. या पाचही कामगाराच्या समस्ये संदर्भातील दि. १९ मार्च २०२४ ला सी.एस.टी.पी.एस. प्रशासनाला पत्रव्यवहार करून, मागील आठवड्यापासून संघटने च्यावतीने सदानंद देवगडे, प्रमोद कोलारकर यांच्या कडून कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात यावे. यासाठी अथक परिश्रम घेण्यात आले. सि.टी.पि.एस प्रशासनाचे अधिकारी यांच्यासोबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. प्रशासकीय अधिकारी वर्ग यांच्याकडून संघटनेला मोलाचे सहकार्य मिळाले. अडोरे कंट्रक्शन कंत्राटदाराला जाब विचारण्यात आला. सी.एस.टी.पी.एस. प्रशासनाचे अधिकारी यांनी कामगार प्रतिनिधी तसेच कंत्राटदार यांच्यासोबत चर्चा करून दि. १ एप्रील २०२४ पासून सर्वांना कामावर घेण्याचे आश्वासित करण्यात आले. त्यानुसार १/०४/२०२४ पासून शिफ्ट नुसार रात्री पाळी पासून कामगारांना कामगार रुजू करण्यात आले. या संदर्भात पाचही कामगारांनी सदानंदजी देवगडे तसेच प्रमोदजी कोलारकर यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त मानले. यावेळी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजूर सेना चे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.



