Tuesday, May 26, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

चंद्रपुरात आयोजित सहविचार सभेत 28 जून रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्याचा जाहीर केला निर्णय

राखीव प्रवर्गातील उमेदवारांना राखीव मध्येच नोकरी या 14 मे चा राज्याचा जीआर रद्द करण्यासाठी आरक्षित घटक एकवटले आहेत. चंद्रपुरात यासंदर्भात एक सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. यात 28 जून रोजी या मागण्यांसाठी चंद्रपुरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या जनगणना कार्यक्रमातही ओबीसी कॉलम नसल्याने ओबीसी नागरिकांनी असहकार पुकारत माहिती न देण्याचा निर्धार सभेत बोलून दाखविण्यात आलाय. आजच्या चंद्रपुरातील सहविचार सभेला ओबीसी (वीजा, भज, & विमाप्र) अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील विविध समाज संघटनाच्या प्रतिनिधी उपस्थित होते. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांची नियुकी आता राखीव प्रवर्गातच होणार असून अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा सांगता येणार नाही असा निर्णय सरकारने घेतला आहे त्या विरोधात आरक्षित घटक समाजाने आंदोलनाचा मार्ग निवडला आहे.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page