Sunday, April 19, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

माजी आमदार पेंटा रामा तलांडी यांच्या नेतृत्वात माननीय मुख्यमंत्री यांना सिरोंच्या येथील समस्याचे निवेदन देतानी-मागण्या मागण्या मान्य न झाल्यास सिरोंच्या येथे आंदोलन-काँग्रेस

**सिरोंचा नगरातील समस्यांवर नागरिक आक्रमक; सादर केलेले निवेदन**

सिरोंचा, २ सप्टेंबर २०२४ – सिरोंचा नगरातील नागरिकांनी विविध समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात नगरातील प्रमुख समस्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात सिमेंट क्रांक्रीट रोड, दूरसंचार सेवा, वीजपुरवठा, बँक सेवा, रस्त्यांची दुर्दशा तसेच ग्रामीण रुग्णालयातील सुविधांची आवश्यकता आदींचा समावेश आहे.

नॅशनल हायवे 353सी वर सिमेंट क्रांक्रीट रोडचे काम सुरु असून या रोडवर दुभाजित (डिवायडर) नसल्यामुळे अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील चार शाळा आणि बाजारपेठेचा वापर करणार्‍या नागरिकांची सुरक्षा धोक्यात आहे. भविष्यात अपघातांचा धोका टाळण्यासाठी सी.सी. रोडवर दुभाजीत बनविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, मुख्य रस्त्यांच्या लगत नालींच्या बांधकामासाठी ग्रीलची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दूरसंचार क्षेत्रातही सिरोंचा येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बी.एस.एन.एल.च्या नेटवर्कची समस्या गंभीर असून, महिन्याला दहा-दहा दिवस नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे शासकीय, खाजगी, बँकिंग व्यवहार, तसेच विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणात अडचणी निर्माण होत आहेत. यावर उपाय म्हणून सिरोंचा येथून अवघ्या 8 कि.मी. अंतरावर असलेल्या तेलंगाणा राज्यातील कालेश्वर येथून बी.एस.एन.एल.ची कनेक्टिविटी करण्याची विनंती करण्यात आली आहे.

वीजपुरवठ्याच्या बाबतीत, सिरोंचा तालुक्याला वारंवार वीज खंडीत होण्याची समस्या भेडसावत आहे. 66के.वी. लाईन जीर्ण अवस्थेत पोहचलेली असून, आलापल्लीहून सिरोंचा पर्यंत टॉवर लाईन ने लाईट जोडण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, तेलंगाणा राज्यातून 132के.वी. लाईनची टॉवरलाईनची सुध्दा जोडणी करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यात उद्योगधंद्यांसाठी मोठी संधी निर्माण होईल.

बँक सेवांबाबतही नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सिरोंचा येथे एकमेव नॅशनल बँक असल्यामुळे ग्राहकांची गर्दी सतत उसळलेली असते. यामुळे अजून दोन नॅशनल बँका उदा. स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सुलभता होईल.

सिरोंचा नगरातील मुख्य रस्ते आणि पूलांवर पथदिव्यांची समस्या गंभीर आहे. सोलार पथदिवे लावण्याची मागणी करण्यात आली आहे. सेन्सर सोलार पथदिव्यांमुळे नगर पंचायत कार्यालयाच्या बिलांची थकीत रक्कम कमी होईल, असे नमूद करण्यात आले आहे.

शिवाजी चौक ते नंदनवन फॉरेस्ट गार्डन(आसरअल्ली रोड) या रस्त्याच्या दुरुस्तीसाठीही नागरिकांनी मागणी केली आहे. या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून, पावसाळ्यात खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

ग्रामीण रुग्णालयाच्या सेवांबाबतही नागरिकांना तक्रारी आहेत. स्थायी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आहेत. यामुळे, सिरोंचा नगराला एम.सी. दवाखाना बनविण्याची मागणी करण्यात आली आहे, ज्यामुळे तालुक्यातील नागरिकांसह छत्तीसगड आणि तेलंगाणा राज्यातील सीमावर्ती भागातील नागरिकांनाही याचा लाभ होईल.

या निवेदनाची प्रत मा. नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, दिल्ली; मा. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य; मा.डॉ. किरसान नामदेव, खासदार, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र; मा. राजे धर्मरावबाबा आत्राम, अन्न व औषधी प्रशासक मंत्रालय, मुंबई आणि जिल्हाधिकारी गडचिरोली यांनाही देण्यात आली आहे.

सिरोंचा येथील स्थानीक नागरिक रूपेश सिरपुरपूवार, पी.आर.तलांडी, एम.ए.अली, रवि सल्लमवार, सतीश भोगे, गणेश बोधनवार, सय्यद कलाम, जहुर अहमद खान, श्याम नडीगोटा समेत सिरोंचा येथील 60हून अधिक नागरिकांनी मिळून हे निवेदन सादर केले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून नागरिकांनी आपले प्रश्न मांडले असून, या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page