Sunday, April 19, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी संभाजी ब्रिगेडचे चंद्रपूर व ब्रम्हपुरी येथे निदर्शने

छत्रपती शिवाजी महाराज यांचा निकृष्ट पुतळा बनविनाऱ्यांवर कठोर कारवाई करा…

छत्रपती शिवाजी महाराजांचा जलदुर्ग सिंधुदुर्ग शेजारी राजकोट वर आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा एकाएकी कोसळून पडला या घटनेचा निषेध आज संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे.छत्रपती शिवराय हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा, स्वाभिमानाचा,अस्मितेचा आणि सन्मानाचा विषय आहे.शिवरायांच्या नावावर या महाराष्ट्रात नेहमीच सत्ता स्थापन झालेली आहे.असे असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जलदुर्ग असलेल्या सिंधुदुर्ग शेजारी राजकोट वर आठ महिन्यापूर्वी उभारलेला शिवछत्रपतींचा पुतळा एकाएकी कोसळून पडतो ही अत्यंत संतापजनक आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लावणारी बाब आहे. या पुतळ्याचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी केलेले होते. भारतीय नौदलाच्या अखत्यारीत या पुतळ्याचे बांधकाम पूर्ण झालेले असताना फक्त आठ महिन्यात हा पुतळा अपमानास्पद स्थितीत कोसळून पडावा हा संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा अपमान आहे. त्याचबरोबर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली, कर्तुत्ववान इतिहासाचा सुद्धा घोर अवमान आहे. या भयानक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तीव्र संताप असून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे. महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळा बांधकामात भ्रष्टाचार व्हावा ही क्लेशदायक घटना आहे. 350 वर्षापूर्वी खुद्द शिवाजी महाराज यांनी बांधलेला सिंधुदुर्ग हा किल्ला दिमाखात उभा असताना 8 महिन्यापूर्वी उभा केलेला पुतळा पडतोच कसा? या पुतळ्याचे बांधकाम करताना आवश्यक ती काळजी घेतली गेली नाही त्यामुळे गांभीर्याने या घटनेची दखल घेऊन शिल्पकार आपटे, कंत्राटदार चेतन पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,त्यांचे सहकारी आणि या घटनेसाठी दोषी असलेल्या सर्वांवर ताबडतोब कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे व त्यांना अटक करण्यात यावी. ही संभाजी ब्रिगेडची संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली. जर ही कारवाई लवकरात लवकर केली नाही तर संभाजी ब्रिगेड छत्रपती शिवरायांच्या या घोर अपमानाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात फार मोठे आंदोलन उभे करेल. त्यामुळे ताबडतोब दोषींवर कठोर कारवाई करावी अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली.

सुरुवातीला संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी यांनी प्रियदर्शन इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करत राज्य सरकारचा निषेध केला. त्यानंतर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे निवेदन देण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य, जिल्हाध्यक्ष प्रा डॉ दिलीप चौधरी, महानगर अध्यक्ष विनोद थेरे, प्रा डॉ योगेश दूधपचारे, राहुल गायकांबळे, प्रवक्ता डॉ सचिन बोधने, संघटक गजानन नागपूरे, महिला आघाडी महानगर अध्यक्ष पायल अन्नदेलवार, जिजाऊ ब्रिगेड कार्याध्यक्ष पल्लवी थेरे, सीमा तेलकापल्लिवर, विलासराव आस्वले, वनिता आसुटकर, आशाताई दुधपचारे, विधानसभा प्रमुख दीपक खारकर इत्यादी प्रमुख पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page