*गडचिरोली जिल्ह्यातील अति मागासलेला वअविकसित अहेरी विधानसभा हा आदिवासी क्षेत्र म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र शासन या आदिवासी बांधवांसाठी लाखो रुपये खर्च करतो, यात प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रावर जास्त खर्च करतो. कारण या क्षेत्रातील मुले/ मुली यांचे परिवार फार गरीब आहेत. त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे, यासाठी या क्षेत्रातील पाचही तालुक्यात आदिवासी मुले /मुली यांना राहण्यासाठी वस्तीगृहाची व्यवस्था केलेली आहे, यावर्षी सन 2024-25 मध्ये या क्षेत्रातील मुले/ मुली यांनी शाळा आणि महाविद्यालय इथं प्रवेश घेतलेला आहे, दोन महिने होऊन सुद्धा या मुला/ मुलींना या क्षेत्रातील वस्तीगृहात प्रवेश मिळाला नसल्याने, या विद्यार्थ्यांना राहण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे? याची वारंवार वरिष्ठाकडे तक्रार करून सुद्धा या तक्रारीकडे कोणतेही अधिकारी लक्ष देत नाही. त्यामुळे आमचे शिक्षण व्यर्थ जाणार काय असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडला आहे, तरी या क्षेत्रातील मुले/ मुली यांनी या क्षेत्रातील माजी आमदार पेंटा रामा तलांडी यांना आपले प्रश्न त्यांच्यापुढे मांडले, तेव्हा माजी आमदार पेंटा रामा तलांडी यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथील प्रकल्प अधिकारी यांना भेटून या संपूर्ण मुला/ मुलीची समस्या तात्काळ सोडवण्याबाबत विनंती केली, व त्यांना सांगितले की तीन दिवसाचा आत या मुला/ मुलींची तक्रारीचे निवारण न झाल्यास काँग्रेस तर्फे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी यांच्या कार्यालयासमोरआंदोलन करण्यात येणार,यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मुस्ताक हकीम, मयूर वीडीपी, आकाश एलम,अशोक तलांडी,किशोर गावडे ,सुरज कोयामी, अनिल मठामी, शंकर कुडगा,आदित्य यल्लम, इत्यादी बहुतेक विद्यार्थी उपस्थित होते.*




