Sunday, April 19, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

शिवसेना के आमदार भास्कर जाधव का हुआ भद्रावती में आगमन

शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे)

७५ वरोरा-भद्रावती विधानसभा

आज दि. 18 डिसें. 2023 रोज-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय “शिवालय” येते पुर्व विदर्भ सर्पक नेते आदरणीय आमदार भास्करजी जाधव साहेब यांनी भेट दिली व आई तुळजा भवानीचे दर्शन घेतले,छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन वंदनिय हिन्दुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होवुन आशिर्वाद घेतला . याप्रसंगी पुर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ साहेब, पुर्व विदर्भ सघंटक सुरेशजी साखरे साहेब,पुर्व विदर्भ युवासेना सचिव तथा सिनेट सदस्य गोडवाना विद्यापीठ निलेशजी बेलखेडे,नागपुर जिल्हा ग्रामीण सर्पक प्रमुख बाळाभाऊ राऊत यांची उपस्थिती होती. सदर भेटी दरम्यान पुर्व विदर्भ सर्पक नेते आदरणीय आमदार भास्करजी जाधव साहेब यांचा शाल ,श्रीफळ व ग्रामगीता तसेच श्रदेय बाबा आमटे व साधनाताई आमटे यांची प्रतिमा देवुन वरोरा-भद्रावती विधानसभाप्रमुख रविद्र शिदे, चंद्रपुर जिल्हासघंटीका सौ नर्मदाताई बोरेकर,उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.सोबतच पुर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ साहेब यांचा वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावती तालुकाप्रमुख नरेद्र पढाल यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यांप्रसगी सपुर्ण पदअधिकारी यांची विचारपुस केली व परिचय करुन घेतला असता वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी विधानसभा क्षेत्रात शिवसेना पदाधिकारी यांना सोबत घेवून “होवू द्या चर्चा” जनसवाद अभियान, शिवसेने(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जिंकलेले निवडणूक जसे सहकार क्षेत्रातील सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विजय संपादीत केल्या असल्याबाबत इत्यादीची माहिती दिली. तसेच विधानसभा क्षेत्रात होत असलेली सामाजिक कामे, जनतेच्या समस्या जाणून घेत त्याचे निराकरण करणे याबाबत सुध्दा माहिती देण्यात आली.याभेटी दरम्यान इयत्ता 12 वीत लोकमान्य कन्या विद्यालय वरोरा येथे शिक्षण घेत असलेल्या कु. खुशी शंकर गोवारदीपे हिला पुर्व विदर्भ संपर्क नेते आदरणीय आ. श्री भास्कर जाधव यांच्या हस्ते “सायकल”भेट देण्यात आली. यावेळी प्रामुख्याने चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे, माजी जिल्हा प्रमुख सतिश भिवगडे, माजी सहसंपर्क प्रमुख रमेश देशमुख, माजी उप-जिल्हा प्रमुख जयदिप रोडे, माजी महानगर प्रमुख मनोज पाल, माजी नगरसेवक आकाश साखरकर आदी उपस्थित होते.महिला जिल्हा संघटीका नर्मदा बोरेकर, उप-जिल्हा प्रमुख तथा सभापती कृउबास भद्रावती भास्कर ताजणे, जिल्हा युवती अधिकारी प्रतिभा मांडवकर, जिल्हा युवा अधिकारी रोहण कुटेमाटे, विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावती तालुका प्रमुख नंदू पढाल, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकार, भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले महीला तालुका प्रमुख सौ सरला मालोकर व सर्व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा क्षेत्रातील शिवसेना आजी-माजी पदाधिकारी सर्व विंग व मोठया संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page