चंद्रपूर मध्ये माझ्या घराजवळ गणेश नगर परिसरात कुणीतरी लहान आग लावली.अती उष्णतेमुळे, वाऱ्यामुळे प्रचंड आग लागली . ती शहरात घुसनार होती परंतु मी ,आम्ही नागरिक त्वरेने स्वतःच्या घरच्या पाण्याने थोडी आग विझविली. अग्निशामक गाडीला फोन लावले,अग्निशामक गाडी उशिरा का होईना आली आणि आग मदावली . शहरातील एक भाग वाचला. अशा तीव्र उष्णतेत शहरात प्लास्टिक चा, झाडांचा कराचा असतो तो एकदा पेटायला लागला की शहरे पेटू शकतात. ह्या आगीच्या ठिकाणी महानगर पालिकेचा, लोकांचा कचरा मोकळ्या जागी टाकला जातो ह्यात दगड माती सोबतच प्लास्टिक, कापड, जैविक कचरा असतो. आम्ही तक्रारी करूनही इथे असा कचरा टाकला जातो. आज दुपारी १२ वाजे नंतर कुणीतरी कचरा पेटविला आणि अती उष्णता आणि जोराच्या हवेमुळे ही आग शहरात यायला लागली. मी स्वतः, आणि शेजारी घरच्या पाण्याने आगीवर नियंत्रण केले, थोड्या वेळाने अग्नि शामक ट्रॅक आला आणि शहरात घुसणारी आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु एक तास ही आग विझली नाही मात्र कमी झाली. अग्निशामक दल उशीरा आले असते तर ही आग गणेश नगर, वरोरा नाका, पत्रकार संघ कार्यालय,नागपूर रोड ह्या परिसरात पसरली असती आणि शहराला आणि लोकांना धोका झाला असता.

अजूनही एक आठवडा उष्णतामान वाढते राहील तेव्हा नगर पालिका आणि नागरिकांनी प्रत्येक वार्डातील कचरा त्वरीत काढून घेतला पाहिजे आणि उषाणेपासून कचरा आणि शहर वाचविले पाहिजे.



