मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे सुपुत्र बाबा आत्राम सारखे दोन वजनदार मंत्री, गडचिरोली जिल्ह्याचे नेतृत्व करीत असताना, जिल्ह्यात दिवसेंदिवस ST बसेस ची अशी दुरावस्था समोर येणे अतिशय लजास्पद आहे. सरकारची स्तुती करनारी जाहिरात असणारे मोठे मोठे पोस्टर बसेस वरती लावून मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो, मात्र त्याच बसा दुरुस्त करण्यात सरकार कडे वेळ नाही की पैसे नाही, का सर्वसामान्य निष्पाप नागरिकांचा जीव घायचा सरकारचा डाव आहे असा प्रश्नचिन्ह गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थिती केला आहे. सरकार गडचिरोली जिल्ह्यात विमानतळ बनविण्याच्या घोषणा करते, मात्र सर्वसामान्य गोरगरीब जनता प्रवास करतो त्या ST बसेस ची व्यवस्था सुधारू शकत नाही, हे आमच्या जिल्ह्याचा दुर्दैव असल्याचे मत महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केले.*



