गडचिरोली जिल्ह्यात अनेक दिवसापासुन सतत धार पाऊस पडत आहे,शेतकरयाने आपल्या शेतात रोवनी केलेली आहे,या सतत धार पावसामुळे शेतकरयचे अतोनाद नुकसान झालेले आहे,शेतकर्याला दुबार पेरणीचे सकंट ओढावले आहे.या क्षेञात नदी-नाले जास्त प्रमाणात आहे,या नदी-नाले जवळील शेतकरयचे शेती पुर्ण पणे नष्ट झालेली आहे,शासणाने सर्वप्रथम या शेतकरयचे शेतीचे तात्काळ पचंनामे करण्यात यावे.पुरामुळे या क्षेञातील अक्षरशः शेकडो हेक्टर जमिन बाधित झाली आहे.व तसेच अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात घराची पडझड झाली आहे.जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजुराची ऐकुणच आर्थिक स्थिती अत्यंत खराब असुन जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकरी,शेतमजुरासह नुकसानग्रस्ताना सरसकट भरीव आर्थिक मदद देण्यात यावी.मागील १४दिवसापासुन पावसाने सम्पुर्ण जिल्ह्याला अक्षरशः झोडपुन काढले आहे,तसेच गोसीखुर्द धरणासह,मेड्डीगट्टा व ईतर धरणाचा विसर्ग वाढल्यामुळे नदी-नाल्यांना पुर आलेला आहे,या पुरामुळे नदीकाठावरील शेती पूर्णतः खरडुन गेलेली आहे,तरी शासणाने गडचिरोली जिल्ह्याला तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा,अशी मागणी ,सिरोंचा येथिल कांँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार,पेन्टांरामा तलांडी यांनी केलेली आहे! –+++++– मुश्ताक हकीम ,तालुका प्रतिनिधी अहेरी* –



