पदवी धारण केलेले भावी शिक्षकांवर अन्याय
*सुशिक्षित युवकांना संधी देण्याची माजी आमदार पेंटा रामा तलांडी यांची मागणी*
*सिरोंचा:*-जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक व उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यामधून पेसा भागात कंत्राटी स्वरूपात निवड व नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यपालन अधिकारी आयुशी सिंह यांनी जारी केले असून मग पदवी धारण केलेले भावी शिक्षक कुठे जायचे ??? असा सवाल अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे माजी आमदार तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पेंटा रामा तलांडी यांनी करून जिल्ह्यातील पदवी धारण केलेले अर्थात ‘भावी शिक्षकांना सेवेची संधी द्या’ अशी तीव्र व एकमुखी मागणी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
पत्रकात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे माजी आमदार पेंटा रामा तलांडी यांनी म्हटले आहे की, शालेय शिक्षण विभागाच्या 15 जुलै 2024 च्या परिपत्रकानुसार शिक्षकांच्या रिक्त पदांवर सेवा निवृत्त झालेल्या शिक्षकांची नियुक्ती व निवड करण्याचे अधिकार मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिले असून त्या अनुषगाने गडचिरोली जिल्ह्यात तशी प्रक्रिया राबविण्याचे व 31 जुलै पर्यंत आवेदन पत्र मागविले असून त्यामुळे डि.एड. व बी. एड. पदवी धारण केलेले उमेदवार अर्थात भावी शिक्षकांवर हा अन्याय असून शासनाने याचा फेरविचार करण्याची मागणी माजी आमदार तलांडी यांनी केले आहे.
पुढे पत्रकात, माजी आमदार पेंटा रामा तलांडी यांनी शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुलांना आपले माता – पिता कठीण परिस्थितीत शिक्षण घ्यायला लावतात ,जिल्ह्यात व प्रामुख्याने अहेरी उपविभागात अनेक हुशार, होतकरू, गरीब विद्यार्थी डि. एड. व बि. एड. अहर्ता धारण करून आणि शिक्षणा सबंधी तत्सम पदव्या घेऊन नौकरी व सेवेच्या आशेवर आहेत. परंतु शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे व ध्येय-धोरणामुळे सुशिक्षित युवकांच्या आशेवर पाणी फेरल्या जात आहे, घोर निराशा केली जात आहे त्यामुळे फेरविचार करून नव्या उमेदीच्या युवकांना अद्यापन करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची तीव्र व एकमुखी मागणी केले आहे.
तसेच सेवा निवृत्त शिक्षक यांनी आपले आयुष्य सेवेतच घालविल्याने आता निवृत्त शिक्षकांना स्वच्छंद जीवन जगण्यासाठी मोकळे करून नव्या उमेदीच्या युवकांना सेवेची संधी देऊन सुशिक्षित बेरोजगार युवकांचे आशा पल्लवित करावे असा आशावाद अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे माजी आमदार तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ट नेते पेंटा रामा तलांडी यांनी पत्रकातून व्यक्त केले.



